मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

मॉन्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी
शहरात रात्री रस्त्यांवर पाणीच पाणी : सखल भागात साचली पाण्याची तळी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : मॉन्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. तर दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. सखल भागात पाण्याची तळी साचल्याचे दिसून आले. दिवसभर उष्म्याने घामाघूम झालेल्या शहरवासीयांना रात्री या पावसाने गारवा अनुभवायला मिळाला. तसेच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
हवामान खात्याने १० जूनपासून पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. बळीराजासह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी पावसाने हुलकावणी दिली होती. गुरुवारी मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. हे वातावरण दिवसभर असेच राहिले. त्यामुळे कोणत्याही क्षणी पाऊस येईल, अशी शक्यता होती. परंतु दिवसभरात पाऊस झालाच नाही. परंतु रात्री साडेदहाच्या सुमारास शहरात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी होऊन सखल भागात पाण्याची तळीच साचली. पादचारी व दुचाकीस्वारांची तर तारांबळ उडाली. पावसापासून बचावासाठी रस्त्याकडेला असलेल्या घरांसह दुकानांच्या छपरांचा नागरिकांना आडोसा घ्यावा लागला. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com