इचलकरंजीत यंत्रमागप्रश्‍नी उद्या बैठक

इचलकरंजीत यंत्रमागप्रश्‍नी उद्या बैठक

इचलकरंजीत उद्या
यंत्रमागप्रश्‍नी बैठक
इचलकरंजी, ता. ८ : यंत्रमाग उद्योगातील अडचणीबाबत आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत सोमवरी (ता. १०) दुपारी ४ वाजता डीकेटीई सभागृहात बैठक आयोजित केली आहे. साधे, रॅपिअर व एअरजेट यंत्रमागधारकांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनने केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी यंत्रमाग उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. शासन दरबारी अनेक प्रश्‍नांसंदर्भात चर्चा झालेली असून, काही प्रश्‍नांची निर्गती झाली आहे. पण, काही प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहेत. निवडणुकीपूर्वी वीज बिलातील सवलतीचा निर्णय होऊन देखील त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. अशा अनेक वेगवेगळ्या प्रश्‍नांबाबतीत आमदार आवाडे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आमदार आवाडे हे यंत्रमागधारकांना येत असलेल्या अडचणी व प्रश्‍न समजावून घेणार आहेत. तसेच निर्णय होऊनही काही धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याची माहिती घेऊन ते शासन पातळीवर मांडून त्याची सोडवणूक करण्याबाबत प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com