गड- डेव्हलपमेंन्ट फुटबॉल लीग

गड- डेव्हलपमेंन्ट फुटबॉल लीग

फोटो क्रमांक :gad81.jpg

88758

इफा लायन्सचे आव्हान कायम
शिवराज युनायटेड डेव्हलपमेंन्ट लीग : युनायटेड रायझिंगची आगेकूच; सिध्दार्थ दड्डीकरचे चमकला

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. ८ : शिवराज युनायटेड डेव्हलपमेंन्ट फुटबॉल लीगच्या दुसऱ्या दिवशी इफा लायन्स आणि युनायटेड रायझिंग स्टार्सने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच कायम ठेवली. इफा लायन्सने दादा जीएम चँलेजर्सचा दोन गोलनी तर युनायटेड रायझिंग स्टार्सने संघर्ष फायटर्सला एका गोलने नमविले. इफाच्या सिद्धार्थ दड्डीकरचे याने दोन आकर्षक गोल करून चमक दाखवली. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे एम. आऱ. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.
चुरशीच्या सामन्यात युनायटेड रायझिंग स्टार्सने उत्तरार्धातील हर्ष कुलकर्णीच्या सुरेख गोलच्या जोरावर संघर्ष फायटर्सला नमविले. पुवार्धात युनायटेड रायझिंगच्या विनायक गोंधळी, स्वरूप शेटके, अभिषेक कोरवी यांनी आक्रमक खेळ करून वर्चस्व ठेवले. पण, संघर्षचा गोलरक्षक अमर गवळी, बचावपटू समर्थ निकम, संदीप हिरेकुडी आणि सहकाऱ्यांनी त्यांचे मनसुबे चिवट खेळत उधळून लावले. उत्तरार्धाच्या ३५ व्या मिनिटाला रायझिंगच्या विनायक गोंधळीने संघर्षच्या बचावफळीला चकवित मुंसडी मारली पण, गोलरक्षक गवळीने चेंडू रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावर मिळालेल्या संधीवर हर्ष कुलकर्णीने अचूक गोल करीत संघाला दिलासा दिला.
महत्त्वपूर्ण सामन्यात इफा लायन्सने सिध्दार्थ दड्डीकरच्या पूर्वार्धातील दोन गोलमुळे दादा जीएम चँलेजर्सला हरवून आव्हान टिकविले. बाराव्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर सिद्धार्थने गोलजाळी भेदत संघाचे खाते उघडले. मध्यंतराला एक मिनिट असताना सिद्धार्थने पुन्हा मैदानी गोल करून आघाडी २-० अशी भक्कम केली. उत्तरार्धात श्रवण पाटील, प्रशांत सलवादे, सुमित कांबळे यांचे बरोबरीचे प्रयत्न इफाच्या खेळाडूंनी निष्फळ ठरविले. सिद्धार्थ दड्डीकर, हर्ष कुलकर्णी यांना सामनावीर तर आदित्य जाधव, धीरज कुरबेट्टी यांना लढवय्या म्हणून क्रीडासाहित्य देऊन गौरविण्यात आले. उद्या (ता. ९) दुपारी तीन वाजता बेळगावचा रेग एफसी विरूध्द गडहिंग्लज युनायटेड हा मित्रत्वाचा सामना होणार आहे.

चौकट...
आज सामन्यांना सुटी
तीन दिवस साखळी पध्दतीने सामने झाले. त्यामुळे संघांना बाद पध्दतीच्या सामन्यांसाठी विश्रांती म्हणून सामन्यांना सुटी आहे. प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. सोमवारी उपांत्य फेरीचे दोन सामने आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com