डीकेटीईच्या १० विद्यार्थ्यांची निवड

डीकेटीईच्या १० विद्यार्थ्यांची निवड

ich81.jpg
88759
इचलकरंजी ः इटूओपन कंपनीत निवड झालेले डीकेटीईचे विद्यार्थी.

डीकेटीईच्या १० विद्यार्थ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ९ ः येथील डीकेटीईमधील इंजिनिअरिंग विभागातील १० विद्यार्थ्यांची इटूओपन या नामांकित कंपनीत आठ लाख पॅकेजवर निवड झाली. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये राहुल भंडारी, रत्नेश पाटील, भक्ती आलासे, अर्सलान फारुक, रोहन भोपळे, दिग्विजय ढोले, प्रथमेश पाटील, तेजस पुंडपाल, केदार सोलापुरे व आर्या सहस्त्रबुद्धे या विद्यार्थ्यांची निवड केली.
निवडीमुळे नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटमध्ये डीकेटीईने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी सॉफ्ट स्कील चाचणी व त्याबद्दलचे मार्गदर्शन आणि टेक्निकल मुलाखतीसाठी तज्ज्ञ प्राध्यपकांकडून मार्गदर्शन केले जाते. त्याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूमध्ये होत आहे.
इटूओपन कंपनीचे मुख्य कार्यालय अमेरिका, टेक्सास येथे आहे. ही कंपनी क्लाउड तंत्रज्ञानावर काम करीत आहे. त्यांच्या ग्राहकांना क्लाउड बेसड् तसेच दूरसंचार, सॉफ्टवेअर, संगणक प्रणाली, इलेक्ट्रॉनिक्समध्ये ही कंपनी सेवा देत आहे. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार व उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, डॉ. सपना आवाडे आदींनी शुभेच्छा दिल्या. प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. के. शिरगावे, प्रा. डॉ. डी. व्ही. कोदवडे, प्रा. डॉ. एस. ए. पाटील, टीपीओ प्रा. जी. एस. जोशी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com