सीबीएस - गेस्ट एडिटर

सीबीएस - गेस्ट एडिटर

लोगो सिटीझन एडिटर
--
फोटो 89095

‘सीबीएस’चे स्थलांतर नको, विभाजन करा
शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मार्ग काढा; संभाजीनगर, रंकाळा बसस्थानकांना द्या सुविधांचे बळ

कोल्हापूर ः शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकाचे (सीबीएस) विभाजन करून संभाजीनगर बसस्थानकाला जोडावे. बसेसचे मार्ग शक्यतो रिंगरोडवरून केल्यास शहरातील प्रवास सुखकर होईल. शहरात सिटीबस यंत्रणा पूर्ण क्षमतेने उभी करून मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, रंकाळा बसस्थानक, अंबाबाई मंदिर अशी सेवा सुरू व्हावी. सिग्नलजवळील एस.टी.बस आणि के.एम.टी बसेसचे थांबे स्थलांतरित करावेत. लवकरच मध्यवर्ती बसस्थानकातील आगार विभाग नागाळा पार्क येथे स्थलांतरित होणार असल्यामुळे तेथे मुबलक जागा उपलब्ध होईल. त्यामुळे कोंडी कमी होईल, असे उपाय आज मान्यवरांनी ‘सकाळ सिटिझन एडिटर’मध्ये सुचवले.

फोटो 88935
गतिरोधकाची उंची, रुंदी
नियमाप्रमाणे असावी

- संदीप गडकर,
मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय

मध्यवर्ती बसस्थानक शहराच्या बाहेरील बाजूस असावे. शहरात एस.टी.बसचे शक्यतो थांबे असू नयेत. स्वतंत्र ‘सिटी बस’ची व्यवस्था नाही तेथे पर्याय नाही. सिग्नलच्या शेजारी किमान शंभर मीटर पार्किंग, थांबा असू नये. तरीही कोल्हापुरातील काही ठिकाणे आहेत, त्यामुळे सिग्नलजवळ वाहतूक कोंडी होते. तेथे अपघाताचा धोका वाढतो. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये येणाऱ्या बाहेरच्या एसटी बसेस बाहेरील स्थानकातून बाहेर जाव्‍यात. त्यासाठी रिंगरोडचा वापर व्हावा. गतिरोधकाची उंची, रुंदी नियमाप्रमाणे असावी. ते कोठे असावेत, यासाठीही नियम आहेत. त्याचाही योग्य वापर व्हावा. मध्यवर्ती बसस्थानकाचे विभाजन वेगवगेळ्या ठिकाणी करावे. प्रत्येक वर्षी जिल्ह्यात नवीन सुमारे पन्नास हजार वाहनांची भर पडत आहे. त्याप्रमाणे रस्ते रुंदीकरण आणि पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे बसस्थानकाचेही विभाजन होणे आवश्‍यक आहे. शक्यतो संपूर्ण बसस्थानकच शहराच्या बाहेरील बाजूला असावे आणि शहरात येण्यासाठी सिटीबसची व्यवस्था असावी. तसे झाल्यास वेळ आणि पैसा वाचणार आहे. प्रदूषण रोखण्यासाठी मदत होणार आहे.

*मध्यवर्ती बसस्थानक शहरातून बाहेर न्यावे
*सिग्नलजवळ असलेले थांबे हलवावेत
*शहरात एसटी बसेसचे थांबे असू नयेत
*शहरात सिटीबसची सेवा दर्जेदार करावी
---------------------
फोटो 88934

उपाययोजना ठरविण्यासाठी हवी
सर्व विभागांची संयुक्त समिती

- डॉ. मनोज पाटील,
पोलिस उपनिरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा

मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर एकामागून एक बसेस थांबल्यामुळे वाहतूक कोंडी अधिक होते. अशीच स्थिती रंकाळा बसस्थानक परिसरात आहे. तेथे कोकणातून येणाऱ्या बसेस रस्त्यावर थांबतात. रंकाळा परिसरात महापालिकेने पार्किंगची व्यवस्था केली नसल्यामुळे तेथे बॉटल नेक झाले आहे. त्याला पर्याय म्हणून खासगी पे ॲण्ड पार्क करण्याचे पर्याय आहेत. संभाजीनगर बसस्थानक सुरू करून तेथून कोकण आणि राधानगरी बाजूला जाणाऱ्या बसेस सोडव्यात. तेथून रंकाळा आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ये-जा करण्यासाठी केएमटीने व्यवस्था करावी. सीपीआर चौकात अतिक्रमण आणि एसटी बसचा थांबा असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. अनेकवेळा याबाबत आराखडे झाले. मात्र, प्रत्यक्षात काहीच आलेले नाही. वाहने वाढत आहेत. मात्र, पर्यायी व्यवस्था होत नाही. गर्दीच्या हंगामात रिकाम्या मैदानांचा वापर केला जातो. शंभर फुटी रस्त्यांचा पार्किंग म्हणून वापर होतो. त्याला कायमस्वरुपी पार्किंगची व्यवस्था करावी. सर्व विभागांची संयुक्त समिती होऊन त्यावर उपाय निश्‍चित करून ते प्रत्यक्षात आणले पाहिजेत. त्यास ठराविक मुदत असावी.

*‘सीबीएस’चे विभाजन करून संभाजीनगरला जोडावे
*शहरात पार्किंगची ठिकाणे वाढवावीत
*सीपीआर थांबा दसरा चौकात स्थलांतर करावा
*सायबर चौकातील थांबाही स्थलांतरित करावा
-------------------
फोटो 88932

बसस्थानक स्थलांतराने
जनतेची गैरसोय होईल

- संतोष बोगरे,
विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ

एसटी महामंडळाचे मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा वेस, संभाजीनगर मुख्य बसस्‍थानक आहेत. सर्वच ठिकाणी एसटीमुळेच वाहतुकीची कोंडी होते, असे नाही. जिथे बस थांबते किंवा बसस्थानक आहे तेथे अतिक्रमण, बेशिस्त पार्किंगमुळेही कोंडी होते. त्यासाठी एसटी बसस्थानकांचे स्थलांतर करा, असे म्हणणे एकतर्फी होईल. एसटीची सेवाही जनतेची सेवा आहे. त्याचे ठिकाण बदलल्यास जनतेची गैरसोय होईल. कोरोनापूर्वी नऊशे एसटी बस सेवेत होत्या. सध्या पाचशे बस आहेत. शहरातील एसटी वाहतूक कमी झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी एसटीमुळेच होते, असे नाही.
बाहेरून येणाऱ्या व जाणाऱ्या बस गाड्या मध्यवर्ती बसस्थानकात सर्वाधिक येतात. त्यासाठी दोन फाटक आहेत. बसस्थानक बांधले तेव्हापासून फाटक तिथेच आहेत. बस आत येतात तेथे पार्सल सेवा आहे. त्यामुळे येणाऱ्या गाड्या व जाणाऱ्या गाड्यांसाठी फाटकांची दिशा बदलणे शक्य नाही. मध्यवर्ती बसस्थानकाच्या मागील बाजूला असलेली यंत्रकार्यशाळा गोकुळ शिरगावकडे स्थलांतरित केली आहे. त्यामुळे उरलेल्या जागेत सध्याच्या बसस्थानकांचा विस्तार होऊ शकले. त्यामुळे जास्त संख्येने बस आतील बाजूला थांबू शकतील, त्यासाठी थोडा काळ जावा लागेल.

*पुणे, मुंबईसाठी मध्यवर्स्थी बसस्थानकात स्वतंत्र जागा करू
*कर्नाटक बस बसस्थानकाबाहेर थांबवू नयेत, यासाठी सूचना
*संभाजीनगर बसस्थानकात रात्रीच्या मुक्कामी बसचा मुक्‍काम
*रंकाळा व रेल्वे स्थानकावरील थांब्यामुळे शेतकरी, प्रवाशांची सोय
----------------------
फोटो 88933

रंकाळा बसस्थानकावर येणाऱ्या
एसटीचा सर्व घटकांना उपयोग

- शिवराज जाधव,
आगारप्रमुख, एसटी महामंडळ, संभाजीनगर

पूर्वी कोल्हापूर शहराची हद्द बिंदू चौकापर्यंत होती. त्यानुसार शहर हद्दीबाहेर बसस्थानके बांधली होती. कालांतराने शहराचा विस्तार झाला. बसस्थानक शहरात आली आहेत. त्यामुळे रंकाळवेश किंवा मध्यवर्ती बसस्थानक शहरात असल्यासारखे वाटत असले तरी रंकाळा वेश बसस्थानकावर अवती भवतीच्या खेडेगावातून नोकरी व्यवसायासाठी येणारे लोक आहेत, विद्यार्थी आहेत. तसेच शेतीमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी आहेत. या सर्व घटकांना रंकाळा बसस्थानकावर येणाऱ्या-जाणाऱ्या एसटी बस उपयोगी आहेत. मात्र, एसटीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी आम्ही खबरदारी घेतो. प्रवासी उतरणे व गाडीत बसणे एवढ्याच वेळसाठी एसटी रंकाळा वेश बसस्थानकात थांबते. हे बसस्थानक स्थलांतरित केल्यास जनतेची गैरसोय होणार आहे. एसटी जनतेच्या सेवेसाठी असताना जनतेची गैरसोय झाली तरी रोष पत्करावा लागतो. पूर्वी रंकाळा बसस्थानक स्थलांतराचा प्रयत्न झाला तेव्हा कोकणापर्यंतच्या लोकांनी आंदोलने केली होती. संभाजीनगर बसस्थानकावरून रोज ७५ बसगाड्यांची ये-जा होते. त्याचा लाभ दहा हजारांवर प्रवाशांना होतो.

*रंकाळा वेस बसस्थानकात रोज वीस हजारांवर प्रवासी ये-जा
*कोकणात जाणाऱ्या काही गाड्याही संभाजीनगरवरून सुटतात
*बाहेरगावच्या एसटी मुक्कामासाठी संभाजीनगरला बसस्थानकात
*बसस्थानक प्रवेशद्वारावरील अन्य घटकांचे अडथळे दूर करावेत
---------------
फोटो 88930

बसस्थानकाशेजारी कर्नाटक
बस थांबल्याल वाहतूक कोंडी

- सुनील जाधव, वाहतूक निरीक्षक, महापालिका परिवहन विभाग

मध्यवर्ती बसस्थानकासमोरील केएमटी थांबा हा प्रवाशांच्या सोयीचा आहे. बाहेर गावावरून येणारे प्रवासी येथे उतरल्यानंतर शहरातील विविध भागांत त्यांना केएमटी बसने प्रवास करता येतो. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा हा बस थांबा आहे. वाहतुकीच्या कोंडीला विविध अडथळे कारणीभूत आहेत. त्यासाठी मधयवर्ती बसस्थानकासमोरील केएमटीचा मार्ग बदलणे किंवा बस थांबा स्थलांतरित करता येणे शक्य नाही. शहरात येणाऱ्या केएमटीची फेरी वटेश्वर मंदिराकडून सुरू केल्यास प्रवासी मिळणार नाहीत किंवा दाभोळकर कॉर्नर परिसरात वटेश्वर मंदिराजवळ वाहतुकीची कोंडी होऊ शकते. बसस्थानक शेजारी कर्नाटकाच्या बस थांबतात, तेव्हा वाहतुकीची कोंडी होते. संभाजीनगरला एसटी बसस्थानक आहे. कोकणकडे जाणाऱ्या गाड्या तेथूनही सोडता येऊ शकतात. यावरही काळानुसार विचार करणे आवश्यक आहे. सार्वजनिक सेवा देणाऱ्या केएमटीची वाहतूक सुलभरितीने व्हावी, हीच अपेक्षा.

*केएमटी सेवेमुळे स्थानिक प्रवाशांची सोय होते
*पर्यटकांच्या सोयीसाठी केएमटी सोयीची ठरते
*केएमटीकडे लवकरच येणार नवीन शंभर बसेस
*रिंगरोडकडून येणाऱ्या गाड्यांसाठी टचिंग पॉईंट ठेवा
------------------
फोटो 88931

केएमटीने बदल स्वीकारले,
एसटीनेही स्वीकारणे गरजेचे
- रघुनाथ धुपकर,
विभाग निरीक्षक, महापालिका परिवहन, केएमटी

शहराअंतर्गत प्रवासी वाहतुकीची सेवा केएमटीला दिली जाते. याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो. मात्र, अनेक ठिकाणी शहरातील मार्गावर एसटी महामंडळाच्या बसमधूनही प्रवासी चढ-उतार करतात. यात महिलांना सवलत असल्याने अनेक महिला प्रवासी एसटीनेही जातात. त्यामुळे केएमटीचा महिला प्रवासी वर्ग एसटीकडे वळला आहे. वास्तविक शहरातील रहदारीच्या मार्गावर एसटीने शहरात प्रवासी घेण्याची आवश्यकता नाही. केएमटी शटल सेवाही देऊ शकतात. रंकाळा बसस्थानकच स्थलांतरित केले तरी तेथे येणाऱ्या प्रवाशांना केएमटी शटल सेवेद्वारे संभाजीनगरपर्यंत पोहोचवू शकते. काळानुसार केएमटीने बदल स्वीकारले. भवानी मंडपातून केएमटीचे बसस्थानक स्थलांतरित केले. असा बदल एसटीनेही स्वीकारणे गरजेचे आहे.

*शहरात विविध मार्गांवर शटल सेवा देणे शक्य
*विस्कळीत पार्किंग सेवेने वाहतुकीस अडथळा
*एसटीने शहरात प्रवासी थांबे घेणे गरजेचे नाही
*केएमटी बस थांब्यावर दीड मिनीटच थांबते
------
चौकट
तुम्हीही व्हा व्यक्त,
पाठवा सूचना आणि नवीन संकल्पना

शहरातील वाढलेली वाहनांची संख्या, वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बस स्थानकाचे स्थलांतर अशा अनुषंगाने तुमच्याही काही सूचना असतील, तर त्या दीडशे शब्दात लिहून आमच्याकडे पाठवा. निवडक सूचनांना प्रसिद्धी दिली जाईल.
त्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक असा...९१४६१९०१९१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com