अभियांत्रिकी प्रवेशाबाबत चर्चासत्राचे आयोजन

अभियांत्रिकी प्रवेशाबाबत चर्चासत्राचे आयोजन

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत
हॉटेल सयाजी येथे मंगळवारी चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता. ११) सकाळी दहा वाजता हॉटेल सयाजी येथे चर्चासत्र होईल. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता मार्गदर्शन करणार आहेत.
गेल्या ४० वर्षांपासून गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ओळखले जाते. उच्च शैक्षणिक परंपरेच्या या संस्थेला २०२१ मध्ये स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला. एनबीए मानांकनही प्राप्त झाले. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती मिळावी, या हेतूने महाविद्यालय ११ वर्षे या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करत आहे. या चर्चासत्राला दरवर्षी सुमारे १२०० हून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती असते.
अभियांत्रिकी शिक्षणाची सद्य:स्थिती, अभियांत्रिकीमधील भविष्यातील ट्रेंड, अभियांत्रिकीनंतरच्या करिअरच्या विविध संधी, आरक्षण आणि जागा वाटप, सरकारकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिप, एमएचटी- सीईटीच्या निकालाचे विश्‍लेषण आणि संभाव्य मेरीट लिस्ट नंबर, राज्यातील टॉप कॉलेजचा कट ऑफ, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक, आवश्यक कागदपत्रे, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ मधील महत्त्‍वाचे बदल, कॉलेजला महत्त्‍व द्यावे की शाखेला याबाबत मार्गदर्शन केले जाईल.
विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले जाणार असून विद्यार्थी-पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, अॅडमिशन सेलचे प्रमुख प्रा. रवींद्र बेन्नी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com