लक्षवेधी फलक

लक्षवेधी फलक

88889
...
सुजल्यावर कळतंय, मारलंय कुठं

शहरात झळकला फलक ः लोकसभेच्या निकालानंतरचे पडसाद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा विजय झाल्यानंतर समाजमाध्यमांवर त्यांच्या अभिनंदनासह विरोधकांवर टीका करणारे ‘मीम्स’ फिरत आहेत. दरम्यान, दाभोळकर कॉर्नर परिसरातील पादचारी पुलावर काल मध्यरात्री लावलेला फलक आणि त्यावर लिहलेला मजकूर शहरभर चर्चेचा विषय ठरला आहे.
या फलकावर ‘सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी मारलंय कुठं’ असा मजकूर लिहला होता. रात्री लावलेला हा फलक आज सकाळी पोलिसांनी काढला, पण समाजमाध्यमांवर या फलकाचीच चर्चा सुरू आहे.
कोल्हापूरची जागा काँग्रेसला आणि शाहू महाराज हेच उमेदवार जवळपास निवडणुकीपूर्वी महिनाभर अगोदरच निश्‍चित होते. या घडामोडीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यासह खासदार शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली. प्रचारातही शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे सर्वच मतदारसंघातील प्रमुख नेते, कार्यकर्ते सक्रिय होते.
या निवडणुकीत शाहू महाराज हे तब्बल दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. शहरात त्यांच्या अभिनंदनाचे फलक ठिकठिकाणी झळकले आहेत; पण काल मध्यरात्री एका कार्यकर्त्याने दाभोळकर कॉर्नर सिग्नलकडून ताराराणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पादचारी पुलावर भला मोठा फलक लावला. त्यावर पवार यांचा फोटो आणि ‘सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी मारलंय कुठं’ असा मजकूर लिहला होता. हा फलकही पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांना याची माहिती समजताच हा फलक पहाटे उतरवण्यात आला, पण दिवसभर या फलकाचीच चर्चा शहरात होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com