कोल्हापूर- मुंबई सायकल सफरीतून जल, जंगल बचावाचा संदेश

कोल्हापूर- मुंबई सायकल सफरीतून जल, जंगल बचावाचा संदेश

88917
भगवंत शिंगाडे

सायकल सफरीतून जल, जंगल बचावाचा संदेश
कोल्हापूर ते मुंबई प्रवास; सव्वा पाचशे किमी. अंतर पूर्ण, शिंगाडे यांचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः जल आपली संपत्ती आणि जंगलामुळे पर्यावरण समतोल राखण्यासाठी मदत होते. हा अमूल्य ठेवा जपण्याचा संदेश सर्वत्र पोहोचवा. याकरिता महापालिका अग्निशमन दलाचे जवान भगवंत शिंगाडे यांनी कोल्हापूर ते मुंबई, असे सव्वा पाचशे किलोमीटरचे अंतर सायकलवरून पार केले. विशेष म्हणजे भाजीपाला असो वा नोकरीचे ठिकाण सर्वत्र ते सायकलवरून जातात.
जल, जंगल, जमीन बचाव अभियान या सामाजिक उपक्रमाद्वारे हजारो किलोमीटरचा सायकल प्रवास करून समाज जागृतीचे काम शिंगाडे करत आहेत. महापालिकेत जोखमीची नोकरी करताना या अवलियाने आजअखेर कोल्हापूर ते रत्नागरी, कोल्हापूर ते सिंधुदुर्ग, कोल्हापूर ते सातारा, जिल्ह्यातील सर्व तालक्याची ठिकाणांचा सायकलवरून प्रवास केला आहे. अग्निशमन दलाच्या सेवेतून जिल्ह्यातील अनेकांचे प्राण वाचविले असून ते जल, जंगल, जमीन बचाव अभियानासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत. भंगवत हे मुळचे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सुपे गावचे सुपुत्र आहेत. पर्यावरणाचा समतोल राखला तरच प्रदूषण नियंत्रणात येईल. जंगले आणि जल ही आपली संपत्ती आहे. याची जाणीव सर्वत्र व्हावी. याकरिता जनजागृतीचा एक भाग म्हणून त्यांनी २९ मे ते तीन जून या कालावधीत दररोज १०० ते १२० किलोमीटर कोल्हापूर ते मुंबई अशी सायकल फेरी पूर्ण केली. या सफारीत पहिला मुक्काम सातारा, तर दुसरा पुण्यात, तिसरा खारघर आणि चौथा कुलाबा येथे केला. मिळेल तेते राहून प्रवास पूर्ण केला. प्रवासादरम्यान अनेकांनी विचारपूस करून कामाचे कौतुकही केले. प्रवासादरम्यान शिंगाडे यांनी जल-जंगल-जमीन बचाव, पुन्हा एकदा सायकल हा संदेश देत जागृती केली.
---------------
कोट
मी गेली दहा वर्षे भाजीपाला खरेदीसह नोकरीच्या ठिकाणी व इतर कामाकरिता सायकलचा वापर करतो. त्यामुळे माझे आरोग्य चांगले राहिले आहे. जल, जंगल, जमीन ही संपत्ती आहे. ती वाचली पाहिजे. सर्वांनी मनावर घेतले, तर पर्यावरणाचा समतोल राखता येईल.
- भगवंत शिंगाडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com