गोकुळ बातमी

गोकुळ बातमी

89036
...
‘गोकुळ’ हा सहकाराचा मानदंड

खासदार विशाल पाटील : संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात सत्कार

कोल्हापूर, ता. ९ : ‘महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सहकार चळवळीचे मोठे योगदान असून ‘गोकुळ’ने सहकारातील मूल्यांची जपणूक करीत दुग्ध व्यवसायातील दूध संकलन, दुधावरील प्रक्रिया व त्याचे वितरण याचे उत्कृष्ट नियोजन करून संस्थेला नावलौकिक प्राप्त करून दिलेला आहे. त्यामुळे ‘गोकुळ’ हा सहकाराचा मानदंड आहे’, असे गौरवोद्‍गार सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील यांनी काढले.
''गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात खासदार पाटील यांनी भेट दिली. यावेळी लोकसभेतील विजयाबद्दल त्यांचा संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. दुग्ध व्यवसायापुढील अडी-अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.
यावेळी डोंगळे म्हणाले, ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांनी सहकाराच्‍या माध्यमातून ग्रामीण भागातील कृषी व दुग्‍ध व्यवसायाचा विकास साधण्या‍चा यशस्‍वी प्रयत्‍न केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात सहकाराची बीजे रोवली गेली आहेत. गोकुळच्या वाटचालीमध्ये वसंतदादा पाटील यांचे मोलाचे योगदान आहे.’
यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील -चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, रयत सेवा कृषी संघाचे चेअरमन सचिन पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिषेक डोंगळे, शिवसेना संपर्क प्रमुख शाकीर पाटील, संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, डी. डी. पाटील, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com