दिव्यांग दाखले

दिव्यांग दाखले

दिव्यांग दाखल्यांचे काम थंडावले

दोन महिन्यंपासून सर्व्हर डाउनची समस्या ः समस्या सोडविण्यास वाली कोण?
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः दिव्यांगांचे दाखले देण्यासाठी सीपीआर रुग्णालयात आरोग्य तपासणी होते. दिव्यंगत्वाची टक्केवारी दिली जाते, मात्र प्रत्यक्ष दिव्यांगांना गेली दोन महिने दाखले मिळत नाहीत. प्रत्येकवेळी सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. मात्र त्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना अथवा माहिती दिली जात नाही. परिणामी दिव्यांगत्वाच्या दाखल्याबाबत कोणी वालीच उरला नाही, अशी स्थिती गेली दोन महिने आहे.
दिव्यांगत्व किती टक्के आहे, कोणत्या स्वरूपाचे दिव्यंगत्व आहे, याची नोंद घेण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दर्जा असलेल्या सीपीआर रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी होते. सर्वाधिक दिव्यंगत्व व्यक्ती अस्‍थिरोग विभागात येतात. त्यापाठोपाठ कर्णबधिर कान, नका, घसा विभाग, गतिमंद व्यक्ती मानसोपचार विभागात येतात. काही हृदयविकार, फुफ्फुस विकार शाखेतही संबंधितांची तपासणी होते.
दिव्यांग व्यक्तीला सुरुवातीला महा ई सेवा केंद्रात ऑनलाईन अर्ज भरतो. तेथे त्याची नोंद होताच संबंधित व्यक्तीला सीपीआरला आरोग्य तपासणीला येते. येथे चार-पाच डॉक्टरांकडून एका दिवसाला २० ते ८० व्यक्तींची आरोग्य तपासणी होते. त्यांच्या दिव्यंगत्वाचे स्वरूप व टक्केवारी डॉक्टरांकडून नोंदवतात. या नोंदी केंद्र सरकारच्या सोशल वेल्फेअर विभागाच्या सॉप्टवेअरला नोंद होतात. त्याच आधारे दिव्यांग व्यक्तीला दिव्यंगत्वाचा दाखला मिळतो. गेल्या दोन महिन्यांपासून दिव्यंगत्वाचे दाखलेच मिळत नाहीत, अशी अडचण आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय (सोशलवेल्फेअर) विभागाने सॉप्टवेअरमध्ये बदल केलेले आहेत. त्यानुसार डॉक्टरांनी नोंदवलेले तपशील काही वेळा पुढे जात नाहीत किंवा गेले तरी ते डाऊनलोड होत नाही तसेच जुना डाटा व नवीन डाटा यांचा मेळ बसत नाही. तपशील ओपन होताना एरर येतात अशा अनेक समस्या या नव्या सॉप्टवेअरमध्ये येत आहेत. परिणामी अंतिमरित्या दिव्यंगत्वाचा दाखला वेळेत मिळत नाही.
पूर्वीच्या सॉप्टवेअरमध्ये केवळ शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेला तपशील ग्राह्य मानला जात होता. आता त्यात सुधारणा करून वैद्यकीय अधीक्षक किंवा शल्यचिकित्सक यांच्या समकक्ष असलेल्या डॉक्टरांची सही असलेला तपशील फक्त घेतला जातो. अशा आशयाचे बदल केले आहेत. यातूनही काही तांत्रिक मुद्दे उपस्थित होत आहेत.
...
दाखल्यासाठीचे सॉप्टवेअर
सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित
दिव्यांगांची महा ई सेवा केंद्रात नोंदणी होते. सीपीआरला तपासणी होते. दिव्यांग आयुक्तालय पुणे यांच्याकडेही तपशील नोंद होतात. मात्र दिव्यांग दाखल्यासाठीचे सॉप्टवेअर सामाजिक न्याय विभाग दिल्लीच्या अखत्यारित आहे. तेथे तक्रार करावी लागते. गेल्या दोन महिन्यात शेकडो तक्रारी झाल्या, मात्र आम्ही दुरुस्ती करीत आहोत. होईल लवकर सुरळीत, एवढेचे उत्तर मिळते.
...

‘सीपीआरमध्ये दिव्यांगांची तपासणी सुरू आहे. दिव्यंगत्वाचे तपशीलही नोंदविले जातात. मात्र त्यासाठी सर्व्हर डाउन किंवा तत्सम तांत्रिक कारणाने दाखले मिळण्यासाठी विलंब होतो आहे. त्यासाठी केंद्रीय विभाग तसेच दिव्यांग आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे.’
-डॉ. शिशीर मिरंगुडे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com