दाभिलमधील अंगणवाडीची इमारत पाडल्याची तक्रार

दाभिलमधील अंगणवाडीची इमारत पाडल्याची तक्रार

ajr96.jpg.....
89080
आजरा ः तहसीलदार समीर माने यांना निवेदन देताना दाभिलचे ग्रामस्थ.
------------------------
दाभिलमधील अंगणवाडीची इमारत पाडल्याची तक्रार
तहसीलदारांना निवेदन ः सरपंच, ग्रामपंचायतीवर आरोप, ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ ः ‘दाभिलमधील अंगणवाडी क्रमांक ३० ची इमारत सरपंच व ग्रामपंचायतीने मनमानी पद्धतीने पाडली आहे. अंगणवाडीतील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे,’ असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबतच्या तक्रारीचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी क्रमांक ३०ची इमारत २००६ मध्ये सर्वसोयींनीयुक्त बांधली होती. मात्र ती पाडली आहे. त्यामुळे इमारत व अंगणवाडीतील साहित्याचे नुकसान केले आहे. अंगणवाडीतील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. अंगणवाडीतील मुलांना शाळा व अन्यत्र ठेवण्याची कसरत करावी लागत आहे. शिक्षणाचा पाया अंगणवाडीतून घातला जात असतो. इमारत पाडून अंगणवाडीतील मुलांचे भविष्य अंधःकारमय केले आहे. सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावाचे मोठे नुकसान केले आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई करावी. सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. अनिल लक्ष्मण नार्वेकर, ज्ञानदेव यशवंत गुरव, शांताराम गंगाराम पाटील, श्रावण दयानंद मस्कर यांच्यासह ग्रामस्थांची स्वाक्षरी आहे.
----------
अंगणवाडी इमारत मंदिराला खेटून होती. मंदिर बांधकामावेळी इमारतीची एक बाजू काढावी लागली. मंदिर बांधकाम काढल्यावर इमारत कमकुवत, धोकादायक झाली होती. वादळ व पावसात इमारत पडली. स्ट्रक्चरल ऑडीटसाठी पाठवले आहे. अंगणवाडीची नवीन इमारत बांधणार आहे.
- युवराज पाटील, दाभिल सरपंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com