गड-ग्रामपंचायत निवडणूक

गड-ग्रामपंचायत निवडणूक

दिल्लीचे झाले; स्थानिक नेत्यांना आता गल्लीचे वेध
जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रलंबित : पाच महिन्यांपासून प्रशासकराज

अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली. दिल्लीत नवे सरकार स्थापन झाले आहे. पण, या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आली होती. गेल्या पाच महिन्यांपासून या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तरी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार का, याकडे लक्ष लागले आहे. गेले चार महिने दिल्लीच्या राजकारणात गुंतलेल्या गावपुढाऱ्यांना आता गल्लीचे वेध लागले आहेत.
जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींची मुदत २७ जानेवारीला संपली. वास्तविक संपणारी मुदत लक्षात घेऊन निवडणूकपूर्व प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित होते. पण, त्यासाठीच विलंब झाला होता. प्रभाग रचना, प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली. पण, तोंडावर लोकसभा निवडणूक होती. त्यात या प्रक्रियेला उशीर झाला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या. परिणामी, जानेवारीपासून २२ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हातात गेला आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका मुदतीत होतील, असा कसाय बांधून गतवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपासूनच गावागावांत मोर्चेबांधणी सुरू झाली होती. पण, निवडणुका पुढे गेल्यामुळे हालचाली थंडावल्या. लोकसभा निवडणुकीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा विषय मागे पडला होता. आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत झाली आहे. त्यामुळे गावपुढाऱ्यांना ग्रामपंचायतीचे म्हणजेच गल्लीतील निवडणुकीचे वेध लागले आहेत. या गावामध्ये नव्याने चर्चा झडू लागल्या आहेत. निवडणुकीची प्रक्रिया केव्हाही सुरू होऊ शकते, असे गृहित धरून गावपातळीवरील नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

चौकट
गतवेळीही पावसाळ्यात निवडणूक
सर्वसाधारणपणे पावसाळ्यात निवडणूक घेणे टाळले जाते. असा विचार झाला तर निवडणुका पुढेही जाऊ शकतात. पण, जिल्ह्यातील या २२ ग्रामपंचायतींची गतवेळची निवडणूक पावसाळ्यातच झाली होती. तेव्हा २७ जानेवारी २०१९ रोजी मुदत संपणार होती. पण, त्याआधीच चार महिने म्हणजे सप्टेंबर महिन्यात निवडणुका घेतल्या होत्या. निवडणूक आधी झाली असली तरी नव्या पदाधिकाऱ्यांनी २७ जानेवारीलाच पदभार स्वीकारला होता.

चौकट
जिल्‍ह्याचा नकाशा वापरावा

या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रलंबित
गडहिंग्लज- अत्याळ, हणमंतवाडी, नांगनूर, तनवडी
चंदगड- मजरे कार्वे, मौजे कार्वे, कामेवाडी
शाहूवाडी- आलतूर, भेंडवडे, चांदोली-घोळसवडे, पुसार्ले
पन्हाळा- बोरपाडळे, काळजवडे, पिसात्री, वाडीरत्नागिरी
करवीर- केर्ले
कागल- चौडाळ, सावर्डे खुर्द, सुरुपली
शिरोळ- आगर, टाकळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com