गडहिंग्लजला उद्यापासून एज्युकेशन महायात्रा

गडहिंग्लजला उद्यापासून एज्युकेशन महायात्रा

एज्युकेशन महायात्रा
------------------------------------------
गडहिंग्लजला उद्यापासून एज्युकेशन महायात्रा
‘सकाळ’तर्फे आयोजन : घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत दोन दिवस चालणार प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित आणि संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत एज्युकेशन महायात्रेला बुधवारपासून (ता. १२) प्रारंभ होणार आहे. येथील आजरा रोडवरील मोहिते फूड कॉर्नर येथे दोन दिवस हे प्रदर्शन चालणार आहे. सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत हे प्रदर्शन खुले राहिल. यानिमित्ताने विद्यार्थी, पालकांना एकाच छताखाली सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती मिळणार आहे. प्रदर्शनाचे यंदाचे बारावे वर्ष आहे.
दहावी, बारावीचा निकाल लागला की वेध लागतात ते पुढील शिक्षणाचे. करिअरची दिशा ठरवण्याची हीच वेळ असते. पण, ती ठरवणे तसे किचकटच. विद्यार्थ्यांचा कल, महाविद्यालयाची निवड, तेथील सोयी-सुविधा, शैक्षणिक खर्चाचा अंदाज, पुढील शैक्षणिक संधी या साऱ्याचा अभ्यास करणे आवश्यक असते. यासाठी विद्यार्थी, पालकांना प्रत्येक शैक्षणिक संस्थेत जाणे म्हणजे वेळ आणि पैसा खर्ची घालावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन ''सकाळ''ने एज्युकेशन महायात्रा या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
या प्रदर्शनात महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतरचे पर्याय, कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, प्रोफेशनल ट्रेनिंग, परदेशी शिक्षणाकरिता मार्गदर्शक कन्सल्टन्सी यासह अन्य अभ्यासक्रमाची माहिती मिळणार आहे. एकाच छताखाली सर्व माहिती घेण्याची संधी यानिमित्ताने उपल्बध झाली आहे. विद्यार्थी, पालकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रदर्शनातील सहभागी संस्था
संत गजानन शिक्षण समूह महागाव, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोटा अॅकॅडमी गडहिंग्लज, डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भडगाव, अंकुर इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी गडहिंग्लज, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा, तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनअरिंग अँड टेक्नॉलॉजी वारणानगर, शिवराज कॉलेज गडहिंग्लज, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यड्राव, न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर.
---------------
स्टॉल बुकिंगसाठी संपर्क
विविध शैक्षणिक संस्थांना अधिकाधिक विद्यार्थी व पालकांपर्यंत पोचण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रदर्शनातील स्टॉल बुकिंगसाठी अरुण भोगले (९८८११२९२२८) यांच्याशी संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com