राष्ट्रवादी वर्धापन दिन

राष्ट्रवादी वर्धापन दिन

फोटो- 89243

१० ते १६ जूनदरम्यान
स्वाभिमान सप्ताह राबविणार

राष्ट्रवादीचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन


कोल्हापूर, ता. १० ः राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून आज साजरा झाला. यानिमित्त १० ते १६ जून या कालावधीत स्वाभिमान सप्ताह राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मार्केट यार्ड येथील पक्ष कार्यालयाबाहेर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी आसुर्लेकर-पाटील म्हणाले, ‘घड्याळ तेच पण वेळ नवी ही विचारधारा घेऊन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी १० ते १६ जून २०२४ या काळात स्वाभिमान सप्ताहात राष्ट्रवादीची मूळ विचारधारा तळागाळात पोहचविण्यासाठी बूथ कमिटी भक्कम करण्यासाठी प्रयत्न करावेत. तालुका, विधानसभा, नगरपालिका क्षेत्र, शहराची कार्यकारिणी बांधणी नव्याने करून नव्या-जुन्याचा मेळ साधून आगामी काळातील निवडणुकीच्या तयारी लागावे. आपल्याला पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हात बळकट करायचे असतील तर जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणावे लागतील. त्यासाठी संघटनेच्या कामात झोकून द्यावे.’
शहराध्यक्ष आदिल फरास, ‘गोकुळ’चे संचालक किसन चौगुले, अल्पसंख्याक सेलचे यासिन मुजावर यांची भाषणे झाली. शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, अमित गाताडे, मधुकर जांभळे, शिरीष देसाई, संजय चितारी, शिवाजी देसाई, संभाजी पाटील-भुयेकर, हर्षवर्धन चव्हाण, विनय पाटील, दाजी बंडू पाटील, अर्जुन जाधव, शहाजी जठार आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी केले. हातकणंगले विधानसभाध्यक्ष संभाजी पवार यांनी अभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com