स्नेहसंगीत प्रतिज्ञा मैफल

स्नेहसंगीत प्रतिज्ञा मैफल

‘स्नेह संगीत प्रतिज्ञा’अंतर्गत
आज अडीच हजारावी मैफल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः येथील प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या ‘स्नेह संगीत प्रतिज्ञा’ उपक्रमांतर्गत गेली पाच वर्षे रोज एका मैफलीतून गरजूंना मदत केली जात आहे. या उपक्रमांतर्गत उद्या (ता. ११) अडीच हजारावी मैफल होणार आहे.
संस्थेची स्थापना २२ ऑक्टोबर २००० रोजी झाली. नाट्यप्रयोगांचे सातत्यपूर्ण सादरीकरण करून त्याच ऐच्छिक शुल्क द्वारे जमणारी सर्व रक्कम समाजातील गरजवंतास देणे, याच उद्देशातून संस्था कार्यरत आहे. गेल्या पाच वर्षांपासून रोज एक गीत मैफल करायची आणि त्यात जमणारी सर्व रक्कम गरजूंना आधार म्हणून द्यायची, असे ठरले आणि त्यानुसार गीत मैफली सुरू झाल्या. लॉकडाउनच्या काळात सानेगुरुजी वसाहत येथील विकास प्रतिज्ञा स्टुडिओमध्ये फेसबुक लाईव्हवरून मैफलीत सातत्य राखले. अडीच हजारावी मैफल उद्या (ता. ११) सायंकाळी चार वाजता सानेगुरुजी वसाहत येथील विकास प्रतिज्ञा स्टुडिओ येथे होणार आहे. ‘मधुबन खुशबू देता है’ या नावाने ही मैफल होणार आहे. या मैफलीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन ‘प्रतिज्ञा’चे प्रशांत जोशी आणि विकास मोने यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com