नीट गैरव्यवहार निदर्शने

नीट गैरव्यवहार निदर्शने

फोटो 89280

‘नीट''मधील कारभाराविरूद्ध
‘अभाविप''ची निदर्शने

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट'' परीक्षेच्या निकालामध्ये गोंधळ झाला आहे. देशभरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विरोधात निदर्शने केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिषदेतर्फे निदर्शने झाली.
नॅशनल एलिजिबिलिटी इंटरेस्ट टेस्ट म्हणजेच ‘नीट'' परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. या निकालामध्ये ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत. यापैकी अनेक एकाच सेंटरवरील विद्यार्थ्यांना समान ७२० गुण मिळाल्याने परीक्षेमध्ये काळाबाजार झाल्याचे स्पष्ट होते. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालण्याचे काम नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) केले आहे. हा निकाल हा संपूर्णपणे पक्षपाती असून, सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी व परीक्षेचा सुधारित निकाल लवकरात लवकर जाहीर करावा अशी मागणी यावेळी महानगर सहमंत्री अजय इटकी यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com