पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

विषारी द्रव्‍य पिल्याने
तरुणीची प्रकृती गंभीर
कोल्हापूर : दौलतनगर, राजारामपुरी येथील एका तरुणीने सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी विषारी द्रव्य प्रशासन केल्याने तिची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे तत्काळ तिच्या कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. या घटनेची नोंद ‘सीपीआर’ पोलिस चौकीत झाली आहे.
---
दसरा चौकात
अपघातामध्ये
तिघेजण जखमी

कोल्हापूर : शहरातील दसरा चौकात रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. सुमती कृष्णा गायकवाड (वय ७५), रोहन जालिंदर दबडे (वय २७), सुजाता सुधाकर गायकवाड (तिघेही रा. पेठवडगांव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
.....
निढोरीच्या तरुणाचा
विषारी द्रव्य
प्‍यायल्‍याने मृत्यू

कोल्हापूर : निढोरी (ता. कागल) येथील विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मृत्यू झाला. विशाल जोतिराम भोसले (वय २८) असे त्यांचे नाव आहे. ७ जूनला रात्री आठच्या सुमारास त्यांनी शेतात विषारी द्रव्य प्राशन केले होते. उपचारासाठी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले होते. घटनेची नोंद येथील पोलिस चौकीत झाली.
....
दुचाकीवरून पडून
तरुण जखमी

कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) येथील सरकारी दवाखान्याजवळ दुचाकीवरून पडून एक तरुण जखमी झाला. तुषार रवींद्र गलियार (वय २१) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com