तनिष्कच्या गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचे जास्तीत जास्त मूल्य

तनिष्कच्या गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचे जास्तीत जास्त मूल्य

‘तनिष्क’च्या गोल्ड एक्स्चेंजमध्ये
ग्राहकांच्या सोन्याला सर्वोत्तम मूल्य
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : ‘तनिष्क’ने सोन्याच्या किमतींमध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर गोल्ड एक्स्चेंज पॉलिसीची घोषणा केली आहे. शून्य वजावटीमार्फत ग्राहकांना सोन्याचे सर्वोत्तम मूल्य मिळवून देण्यासाठी या एक्स्चेंज पॉलिसीमध्ये जुन्या सोन्याला ‘तनिष्क’च्या सर्वात नवीन डिझाइन्ससह अपग्रेड करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
‘तनिष्क’ची गोल्ड एक्स्चेंज पॉलिसी या उपक्रमांतर्गत ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य, उत्तम कारीगरी व पारदर्शक एक्स्चेंज प्रक्रिया उपलब्ध करून दिली जात आहे. भारतातील कोणत्याही ज्वेलर्सकडून खरेदी केलेल्या २२ आणि त्यापेक्षा जास्त कॅरेटच्या जुन्या सोन्यावर १०० टक्के मूल्य मिळवून दिले जात आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना ‘तनिष्क’च्या सर्वात नवीन कलेक्शन्समधील सुंदर दागिने मिळवण्याची सुवर्णसंधी मिळेल. ग्राहकांची पसंती व प्राथमिकता विचारात घेत ‘तनिष्क’ने आधुनिक व पारंपरिक डिझाईन्सची मोठी श्रेणी प्रस्तुत केली आहे. यामध्ये प्लेन सोने, ग्लास कुंदन, कुंदन पोल्की, ओपन पोल्की, पीजेडब्ल्यूएस, कलर स्टोन्स यांनी बनवलेले अनेक दागिने आहेत. ग्राहकांच्या सुविधेसाठी ‘तनिष्क’मध्ये गोल्ड एक्स्चेंज सेवा संपूर्ण वर्षभर दिली जाते. या पॉलिसीचा लाभ ‘तनिष्क’च्या सर्व स्टोअर्समध्ये घेतला जाऊ शकतो. लग्नसराई व इतर समारंभांसाठी सोन्याची खरेदी केली जाते. टायटन व टाटा समूहाची प्रामाणिकता व विश्‍वसनीयतेच्या मजबूत आधारावर उभा तनिष्क ब्रँड सर्वात शुद्ध दागिने बनवण्यात नेहमीच आघाडीवर असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ‘तनिष्क’तर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com