आजपासून भरणार एज्युकेशन महायात्रा

आजपासून भरणार एज्युकेशन महायात्रा

एज्युकेशन महायात्रा लोगो वापरावा...
------------------------------------------
आजपासून भरणार एज्युकेशन महायात्रा
गडहिंग्लजला ‘सकाळ’तर्फे आयोजन : घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत दोन दिवस चालणार प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : महिनाभरापूर्वीच गावोगावच्या यात्रा-जत्रांचा हंगाम संपला आहे. पण, गडहिंग्लजला उद्यापासून (ता. १२) एक नवी महायात्रा भरणार आहे. ही आहे एज्युकेशन महायात्रा. विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणारी. सकाळ माध्यम समूहातर्फे या एज्युकेशन महायात्रेचे आयोजन केले आहे. संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत हे शैक्षणिक प्रदर्शन दोन दिवस चालणार आहे.
दरम्यान, गडहिंग्लजला या प्रदर्शनाचे यंदाचे बारावे वर्ष आहे. येथील आजरा रोडवरील मोहिते फूड कॉर्नर येथे दोन दिवस हे प्रदर्शन चालेल. सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत ते खुले राहणार आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थी, पालकांना एकाच छताखाली सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती मिळणार आहे.
दहावी, बारावीचा निकाल लागला की वेध लागतात ते पुढील शिक्षणाचे. करिअरची दिशा ठरवण्याचीही हीच वेळ असते. पण, ती ठरवणे तसे किचकटच. विद्यार्थ्यांचा कल, महाविद्यालयाची निवड, तेथील सोईसुविधा, शैक्षणिक खर्चाचा अंदाज, पुढील शैक्षणिक संधी या साऱ्याचा अभ्यास करणे आवश्यक असते. यासाठी विद्यार्थी, पालकांना प्रत्येक शैक्षणिक संस्थेत जाणे म्हणजे वेळ आणि पैसा खर्ची घालावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन ''सकाळ''ने एज्युकेशन महायात्रा या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
या प्रदर्शनात महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतरचे पर्याय, कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, प्रोफेशनल ट्रेनिंग, परदेशी शिक्षणाकरिता मार्गदर्शक कन्सल्टन्सी यासह अन्य अभ्यासक्रमाची माहिती मिळणार आहे. एकाच छताखाली सर्व माहिती घेण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. विद्यार्थी, पालकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.
-----------------------
प्रदर्शनातील सहभागी संस्था
संत गजानन शिक्षण समूह महागाव, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, सेवासदन कॉलेज ऑफ नर्सिंग गडहिंग्लज, डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भडगाव, अंकूर इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी गडहिंग्लज, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्‍‍ड टेक्नॉलॉजी आष्टा, तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनअरिंग ॲन्‍‍ड टेक्नॉलॉजी वारणानगर, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यड्राव, श्री प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हौसेस न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर, शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट गडहिंग्लज, इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल ॲन्‍ड रुरल इंजिनिअरिंग गारगोटी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com