केडीसीसी -स्वीकृत सदस्यांवर शुक्रवारी शिक्कामोर्तब

केडीसीसी -स्वीकृत सदस्यांवर शुक्रवारी शिक्कामोर्तब

लोगो ः केडीसीसी

जिल्हा बॅंकेच्या स्वीकृत संचालकासाठी रस्सीखेच
आसिफ फरास निश्‍चित : पेरीडकर, भुयेकर, काझी व गोपाळराव पाटील चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून जिल्हा बॅंकेच्या रखडलेल्या स्वीकृत सदस्यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. यासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यातून आसिफ फरास, गोपाळ पाटील, राजू काझी, प्रदीप पाटील भुयेकर, सर्जेरावर पेरडकर, विलास गाताडे, अनिल चौगले यांची नावे प्राथमिक टप्प्यात पुढे येत आहेत. सध्या ही नावे चर्चेत असली तरीही संचालक मंडळावर ज्या नेत्याचा दबदबा आहे, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
बॅंकेत सध्या २१ संचालक आहेत. त्यांची मुदत २०२६-२७ पर्यंत आहे. निवडणूक आलेल्या २१ संचालकांव्यतिरिक्त दोन स्वीकृत सदस्यांची (तज्ज्ञ संचालक) नियुक्ती संचालक मंडळाकडून केली जाते. २०२१-२२ ला नवीन संचालक मंडळ स्थापन झाले तरीही अद्याप या दोन संचालकांची नियुक्ती रखडलेली होती. विद्यमान संचालक मंडळाच्या उरलेल्या साधारण दोन वर्षाच्या कालावधीसाठीही निवड होण्‍याची शक्यता आहे. पालकमंत्री तथा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचे विश्‍वासू आसिफ फरास यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. तर दुसरे नाव दोनच दिवसांत निश्‍चित होईल. ते नाव आमदार विनय कोरे यांच्या गटाकडून येण्याची शक्यता आहे.
अध्यक्ष हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांच्या चर्चेनंतर ही नावे निश्‍चित होणार आहेत. आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पुत्र राजेश पाटील यांची निवड करण्यात येणार आहे.

चौकट
शुक्रवारच्या बैठकीत चर्चा शक्य
दोन स्वीकृत संचालकांची याच महिन्यातच निवड होणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. यामध्ये काही माजी संचालक, काही पराभूत संचालकांचाही विचार होणार आहे. मात्र, त्या नावावर शुक्रवारी (ता.१४) होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल, असेही सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com