टर्फ क्रिकेट मैदानांची परवानगी तपासणार

टर्फ क्रिकेट मैदानांची परवानगी तपासणार

टर्फ क्रिकेट मैदानांची परवानगी तपासणार

इचलकरंजी पालिका आयुक्त दिवटे ः स्ट्रक्टरल ऑडिट करण्याचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ११ ः शहरातील टर्फ क्रिकेट मैदानांच्या परवानगीची महापालिकेकडून तपासणी केली जाणार आहे. याबाबतचे आदेश आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी नगररचना विभागाला दिले आहेत. होर्डिंगनंतर आता या मैदानांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे.
शहरात सुमारे सात ते आठ टर्फ क्रिकेट मैदाने आहेत. सकाळी आणि रात्रीच्या वेळेत तेथे क्रिकेट आणि फुटबॉल खेळ खेळले जातात. सकाळच्या सत्रात दर तासाला शुल्क आकारणी केली जाते, तर रात्री विजेचा प्रकाशझोत असल्याने जादा शुल्क घेतले जाते. पुणे होर्डिंग घटनेनंतर महापालिकेने शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. होर्डिंगप्रमाणे टर्फ मैदाने धोकादायक बनू शकतात, अशा शक्यतेतून त्यांच्या तपासणीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
वास्तविक टर्फ मैदान उभारणी करताना नगररचना विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार परवानगीची पाहणी केली जाणार आहे. त्यासंदर्भात नगर रचना विभागाकडून नोटिसा काढल्या जाणार आहेत. परवानगी असेल तर त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे लागणार आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून त्याची कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे. तसेच या मैदानांचे असेसमेंट करण्यात येणार असून, त्यानुसार शुल्क आकारणी केली जाणार आहे.
...
चौकट...
कारवाईकडे लक्ष
शहरात सुरुवातीला हौस म्हणून एक-दोन टर्फ क्रिकेट मैदानांची उभारणी करण्यात आली; पण अलीकडे अनेक भागात अशा मैदानांची उभारणी केली जात आहे. मात्र, यातील अनेक मैदानांची उभारणी करताना महापालिकेच्या नगररचना विभागाकडून परवानगी घेतली जात नसल्याचे समजते. त्यामुळे परवानगी नसल्यास अशा मैदानांवर महापालिका प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com