राजेश क्षीरसागर बैठक बातमी

राजेश क्षीरसागर बैठक बातमी

(फोटो 89528)

शहरातील कामे थांबवून
सरकारची बदनामी का करता?

राजेश क्षीरसागर यांच्याकडून अधिकारी धारेवर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : शहरातील प्रमुख रस्ते, रंकाळा सुशोभीकरण, गांधी मैदान संवर्धन अशी कामे रखडली आहेत. आम्ही राज्य सरकारकडून निधी आणतो. पण, ही कामे रखडवून तुम्ही सरकारची बदनामी करता. नालेसफाई, रस्ते, प्रॉपर्टी कार्ड अशी सर्व कामे गतीने करण्याची सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिला. आज त्यांनी शहरातील विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
शहरातील ६४ झोपडपट्टयांबाबत प्रॉपर्टी कार्ड वाटपाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्येक झोपडपट्टीची वर्गवारी करून त्या त्या भागातील सर्‍हे, ले आऊट आणि इतर अनुषंगिक कामांचे नियोजन करून ४५ दिवसांचा प्लान तयार करण्याच्या सूचना दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.

चौकट
फुटबॉल अकादमीसाठी शेंडा पार्क
क्षीरसागर यांनी कोल्हापुरात फुटबॉल अकादमी गरजेची असल्याचे सांगितले. अकादमीसाठी शेंडा पार्क येथे १० हेक्टर जागा लागणार आहे. त्याच जागेत क्रीडा विभागाचे कार्यालयही प्रस्तावित आहे.

चौकट
राजाराम बंधारा नवीन पूल कामाचा आढावा
राजाराम बंधारा येथील नवीन पुलाच्या कामाबाबत आढावा घेतला. भूसंपादनबाबत नव्याने मोजणी प्रक्रिया आठवड्यात मार्गी लावून त्यानंतर किमान साडे तीन महिने अवधी लागेल. त्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरू करता येईल, असे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑक्टोबरपर्यंत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मार्च २०२५ अखेर सर्व काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम, उपविभागीय व मोजणी कार्यालयाला दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com