सांस्कृतिक पट्टा

सांस्कृतिक पट्टा

सांस्कृतिक कोल्हापूर

89545
कोल्हापूर : प्रयोदी फाउंडेशनतर्फे झालेल्या ‘रिमझिम गिरे सावन..’ मैफलीचे उद्‍घाटन करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर.
‘रिमझिम गिरे सावन...’
मैफलीला प्रतिसाद
प्रयोदी, अश्‍वघोष फाउंडेशनतर्फे आयोजन
कोल्हापूर, ता. ११ : प्रयोदी फाउंडेशन आणि अश्‍वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनतर्फे आयोजित ‘रिमझिम गिरे सावन...’ मैफलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजर्षी शाहू स्मारक भवनात ही मैफल रंगली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते मैफलीचे उद्‍घाटन झाले.
कबीर नाईकनवरे, आम्रपाली कुरणे, संग्राम पाटील, सई लकडे, प्रवीण बनसोडे, रवींद्र इनामदार, प्रशांत शिराळे यांचा स्वरसाज होता. प्रयोदी फाउंडेशनच्या अध्यक्षा योगिता कोडोलीकर, शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर, अश्‍वघोष फाउंडेशनचे अध्यक्ष कबीर नाईकनवरे, प्रा. डॉ. सरोज बिडकर, राज्य मंत्रालय गृह विभागाचे उपसचिव विजय पोवार, मीनल राजहंस, मंदार पाटील, ऋतुराज माने, अभिजित राऊत, बाळासाहेब भोसले, संपदा मुळेकर, किशोर घाडगे, अनिल लवेकर, रणजित माजगावकर, डॉ. सत्यजित कोसंबी, मदन पवार, सागर बगाडे, विजय टिपुगडे, रमेश भोसले, डॉ. समाधान बनसोडे, राजेंद्र बनसोडे आदी उपस्थित होते. आनंद भोजने यांनी आभार मानले.
-------------------
89549
कोल्हापूर : येथील तितिक्षा कला, साहित्य व कवी संमेलनात सर्वोत्कृष्ट कवींना पारितोषिके देण्यात आली.

तितिक्षा कला, साहित्य,
कवी संमेलन उत्साहात
कोल्हापूर, ता. ११ : पुणे येथील तितिक्षा इंटरनॅशनलतर्फे येथे तितिक्षा कला साहित्य व कवी संमेलन झाले. अभिनेत्री छाया सांगावकर, नाट्य दिग्दर्शक सतीश इंदापूरकर, सतीश रणदिवे, पितांबर काळे, संजय हळदीकर, लेखक हिमांशू स्मार्त, युवराज पाटील, अभिनेत्री शर्वरी जोग, सतीश चिल्ले, रवींद्र पायमल आदी उपस्थित होते.
‘सोल्युशन माईंड’चे सुजित दातार यांच्यातर्फे पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट कवींना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार, एक हजार अशी पारितोषिके देण्यात आली. साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवरांचे यावेळी सत्कार झाले. प्रिया दामले व रवींद्र पायमल यांनी संयोजन केले.
----------------
89552
‘३८ कृष्ण व्हिला’ नाटकातील एक प्रसंग.

‘३८ कृष्ण व्हिला’
नाटकाचा सोमवारी प्रयोग
कोल्हापूर, ता. ११ : डॉ. श्‍वेता पेंडसे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘३८ कृष्ण व्हिला’ नाटकाचा सोमवारी (ता. १७) येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात प्रयोग होणार आहे. सायंकाळी सातला हा प्रयोग होईल. दरम्यान, शनिवारी (ता. १५) सातारा, रविवारी (ता. १६) कराड, मंगळवारी (ता. १८) सांगली येथे या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
संपूर्ण नाटक दोन पात्रांच्या खांद्यावर आहे. गिरीश ओक आणि श्‍वेता पेंडसे यांचा अभिनय आणि लेखकाचे संवाद यामुळे ही जुगलबंदी पाहण्यासारखी ठरते. शीतल तळपदे यांची प्रकाश योजना, तर तिसरे पात्र आहे इतकी उत्तम असून अजित परब यांचे संगीत पूरक आहे. संदेश बेंद्रे यांच्या नेपथ्यातून बंगल्याचा जिवंत अनुभव मिळतो. कोल्हापूरकरांनी या प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाट्यवितरक आनंद कुलकर्णी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com