चिकोडे ग्रंथालय संवाद बातमी

चिकोडे ग्रंथालय संवाद बातमी

89578
जगणे समृद्ध करण्यासाठी
पुस्तके, माणसे वाचावीत

आर. जे. स्नेहा, ओंकार यांचे मत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ११ ः ‘‘जगणे समृद्ध करण्यासाठी पुस्तके आणि माणसे वाचणे आवश्यक आहे. दोन्ही गोष्टी जगण्याचा चांगला मार्ग दाखवतात,’’ असे मत आर.जे. स्नेहा दीक्षित आणि ओंकार थोरात यांनी व्यक्त केले. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयातर्फे आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल चिकोडे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
यावेळी राहुल यांनी दोघांनाही वाचनाचे महत्त्व, व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचनाची गरज, वाचन चळवळीबाबत त्यांची मते विचारली. रेडिओ जॉकी म्हणून काम करताना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते; या कामातील आनंदाबाबतही चर्चा केली. रेडिओ स्टेशन कार्यरत राहण्यासाठी त्यांच्यामागे अनेक असणारे हात कसे काम करतात हे सांगितले. श्रोत्यांशी एकरूप होऊन संवाद साधत गेल्यानंतर त्यांच्या अनुभवाचे भन्नाट किस्से ऐकण्यास मिळाले. उपस्थित श्रोत्यांनी प्रश्न विचारत औत्सुक्याचे व शंकांचे समाधान करून घेतले. या कार्यक्रमासाठी उद्योगपती अविनाश शिरगावकर भक्तजन प्रणित मंडळाचे सदस्य, चिकोडे ग्रंथालयाच्या महिला सदस्य, नागरिकांसह तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. योगेश चिकोडे यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचे स्वागत उद्योगपती अविनाश शिरगावकर व सुप्रिया कोरडे यांनी केले. वक्त्यांचा परिचय अस्मिता कुलकर्णी यांनी करून दिला. राहुल चिकोडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश गुरव, हरिकृष्ण आत वाडकर, प्रथमेश पिष्टे, मधुरिमा चिकोडे, श्रद्धा पाटील, जयदीप मोरे यांनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com