विशाळगडावरील पशूहत्या बंदीची अंमलबजावणी करा

विशाळगडावरील पशूहत्या बंदीची अंमलबजावणी करा

‘विशाळगडावरील
पशुहत्या बंदीची
अंमलबजावणी करा’

कोल्हापूरः विशाळगडावर पशुहत्येला बंदी असतानाही काहीजण येथे बकरी, कोंबड्यांचे बळी देत आहेत. प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस प्रशासनाला दिले.
विशाळगडावर पशुहत्येला होणाऱ्या विरोधामुळे प्रशासनाने येथे कत्तल करण्यास बंदी केली होती. मात्र, येथे बकरी आणि कोंबड्यांची कत्तल सुरू आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. गडाच्या पायथ्याला पोलिस चौकी असतानाही गडावर पशू कसे नेले जातात, याची माहिती घ्यावी, अशा मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले. संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे, आशिष पवार, अनिल चोरगे, प्रशांत कागले, सोनू विश्वकर्मा, योगेश शेटके, मनोहर सोरप उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com