‘शिवराज’तर्फे शहीद जवान अशोक बिरंजे स्मृती दौड

‘शिवराज’तर्फे शहीद जवान अशोक बिरंजे स्मृती दौड

Published on

gad287.jpg
93454
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयातर्फे शहीद जवान अशोक बिरंजे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दौड काढण्यात आली. याप्रसंगी अॅड. दिग्विजय कुराडे, डॉ. एस. एम. कदम, परशुराम भोई आदी.
--------------------------
‘शिवराज’तर्फे शहीद जवान
अशोक बिरंजे स्मृती दौड
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : येथील शिवराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे शहीद जवान अशोक बिरंजे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृती ज्योत दौड झाली. महाविद्यालयात शहीद जवान अशोक बिरंजे यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते झाले. शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांच्याहस्ते स्मृती ज्योत प्रज्वलित केली.
महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय धावपटू परशुराम भोई यांच्याकडे स्मृती ज्योत सुपूर्द केली. खेळाडूंनी दौड करीत स्मृती ज्योत वैरागवाडी येथील शहीद जवान अशोक बिरंजे स्मृती स्थळाजवळ मिरवणुकीने नेली. स्मृती ज्योतीचे स्वागत ग्रामस्थांनी केले. वीरमाता लक्ष्मीबाई बिरंजे, वीरपिता बाबूराव बिरंजे, वीरपत्नी सविता बिरंजे, सुरेश बिरंजे, सरपंच पी. के. पाटील आदी उपस्थित होते. विभाग प्रमुख डॉ. राहुल मगदूम, क्रीडा शिक्षक जयवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दौडीचे नियोजन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.