नागरीकांनी नवीन कायदे समजून घ्यावेत

नागरीकांनी नवीन कायदे समजून घ्यावेत

Published on

chd23.jpg
94184
चंदगड : नवीन कायद्यांसंदर्भात माहिती देताना विश्वास पाटील. शेजारी प्राचार्य डॉ. गोरल आदी.
-------------------------
नागरिकांनी नवीन कायदे समजून घ्यावेत
पोलिस निरीक्षक पाटील : माडखोलकर महाविद्यालयात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३ ः ब्रिटिश काळात तयार केलेले काही कायदे कालबाह्य झाले आहेत. त्यामध्ये शासनाने बदल करून नवीन कायदे अमलात आणले आहेत. नुकतीच त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सुजाण नागरिकांनी कायद्यातील हे बदल समजून घ्यावेत, असे आवाहन पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी केले.
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी या विषयावर संवाद साधला. प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य गोरल म्हणाले, ‘आजचा तरुण हा उद्याचा जागरुक नागरिक आहे. समाजाच्या हितासाठी राबवण्यात येणारे कायदे त्याने समजून घेतल्यास स्वस्थ समाजनिर्मिताला मदत होणार आहे.’ डॉ. एस. एन. पाटील यांची बेळगाव येथील राणी चनम्मा विद्यापीठाच्या हिंदी अभ्यासक्रम निवड समितीवर निवड झाल्याबद्दल सत्कार केला. नंदकुमार चांदेकर व अनिल पाटील यांनी ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली. प्रा. ए. डी. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सरोजिनी दिवेकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.