‘बीएसएनएल’ च्या निवृत्तांची निदर्शने

‘बीएसएनएल’ च्या निवृत्तांची निदर्शने

‘बीएसएनएल’च्या
निवृत्तांची निदर्शने
गडहिंग्लज : पे-रिव्‍हिजनच्या प्रमुख मागणीसाठी भारत संचार निगमच्या (बीएसएनएस) निवृत्त कर्मचाऱ्यांनी आज निदर्शने केली. बीएसएनएल पेन्शनर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली येथील विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. पेन्शनर्स असोसिएशनतर्फे आज देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार आज सकाळी साडेअकराला निवृत्त कर्मचारी येथील वडरगे मार्गावरील बीएसएनएलच्या विभागीय कार्यालयासमोर जमले. त्यांनी जोरदार निदर्शने केली. रामय्या हिरेमठ, सुरेश देसाई, श्रीधर हवालदार, दिलीप दळवी, रवींद्र महाडिक, राजेंद्र देसाई, अशोक सांगावकर, विजय करविनकोप्पा, आण्णासाहेब देसाई, महादेव चव्हाण, आदी निवृत्त कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com