शेतकऱ्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करावा

शेतकऱ्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करावा

Published on

gad21.jpg
94249
गडहिंग्लज : कृषी दिनानिमित्त रब्बी हंगामातील पीक स्पर्धेतील विजेत्यांना शरद मगर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी हरिदास बोंगे, सुधाकर खोराटे, अनिल कांबळे, आदी उपस्थित होते.
-----------------------------------------------
शेतकऱ्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करावा
गटविकास अधिकारी मगर : कृषी विभाग, पंचायत समितीतर्फे कृषी दिन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्‍वीकार करण्याची गरज आहे. याद्वारे खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. यासाठी कृषी विभाग व सर्व ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांच्या संपर्कामध्ये राहण्याचे आवाहन गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्र. तालुका कृषी अधिकारी हरिदास बोंगे यांनी शासकीय योजना, कृषी सहा‍यक विजय खोराटे यांनी सोयाबीन पीक लागवड तंत्रज्ञान व कीड रोग व्यवस्थापन, धन्वंतरी देसाई यांनी अन्नधान्य प्रक्रिया योजना, तालुका विमा प्रतिनिधी पल्लवी कोकितकर यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत, तर प्रणित घुंगूरकर यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी वापराबाबतची माहिती दिली.
२०२२-२३ मधील रब्बी हंगामातील तालुकास्तरीय पीक स्पर्धेतील प्रथम क्रमांक गुरुनाथ बंडगर (मुगळी), द्वितीय शिवपुत्र शिंत्रे (भडगाव), तर तृतीय आप्पासाहेब आरबोळे (तनवडी) या विजेत्यांना सन्मानपत्र देऊन गौरवले. सहायक गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, कृषी अधिकारी भूपाल कांबळे, विस्तार अधिकारी सुमित जज्जेवार, सूरज बचाटे, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.