शेती समृद्धीसाठी नवीन तंत्रज्ञान आवश्‍यक

शेती समृद्धीसाठी नवीन तंत्रज्ञान आवश्‍यक

शेती समृद्धीसाठी नवीन तंत्रज्ञान आवश्‍यक

जिल्हाधिकारी अमोल येडगे : ‘आदर्श गोठा पुरस्कारां’चे वितरण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : ‘देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि शेतकऱ्यांचे खूप मोठे योगदान आहे. शेती समृद्ध करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि योजनांचा अवलंब करायला हवा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत कृषी दिनाचे औचित्य साधून आदर्श गोठा पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस. यांच्याहस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.
केरबा माने (कौलगे, ता. कागल), सुमित्रा पाटील (बर्सेवाडी, ता. भुदरगड), नंदकुमार साळोखे ( टोप. ता. हातकणंगले), आयुब मुल्ला (लाटवडे, ता. हातकणंगले), कलगोंडा टेळे (सुळकूड, ता. कागल), शरद देवेकर (बर्सेवाडी, ता. भुदरगड) व अजित सौदे (वसगडे, ता. करवीर) या शेतकऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, शेंडा पार्क येथील संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. अशोककुमार पिसाळ, कीटकशास्त्र विभागाचे सहायक प्रा. अभयकुमार बागडे, तानाजी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, कृषी अधिकारी गौरी मठपती उपस्थित होते.
...
चौकट....
आदर्श गोठा पुरस्कारप्राप्त
गुरुनाथ पाटील आवळी (ता. राधानगरी), दत्तात्रय पाटील (रा. पेरणोली, ता. आजरा), धनाजी पाटील (बानगे, ता. कागल), संदीप सरनोबत (थेरगाव, ता. शाहूवाडी), सचिन मोरे (संभापूर, ता. हातकणंगले), गुरुनाथ गमाजगोळ (हलकर्णी, ता. गडहिंग्लज), प्रकाश महाडिक (सोनुर्ले, ता. भुदरगड), सुमित परीट (कुरुकली, ता. करवीर), बाबासाहेब पाटील (पोर्ले तर्फे ठाणे, ता. पन्हाळा), बजरंग अंबेकर (मांडुकली, ता. गगनबावडा), अश्‍विनी चौगुले (बस्तवाड, ता. शिरोळ).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com