जिल्हा बँकेकडून क्यूआर कोडचे वाटप

जिल्हा बँकेकडून क्यूआर कोडचे वाटप

gad25.jpg
94257
अत्याळ : जिल्हा बँकेमार्फत व्यावसायिकांना क्यूआर कोडचे वाटप केले. एन. एस. कागवाडे, एस. आर. नाईक, सतीश पोवार, आदी उपस्थित होते.
-----------------------
जिल्हा बँकेकडून क्यूआर कोडचे वाटप
गडहिंग्लज, ता. २ : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील शाखेकडून क्यूआर कोडचे ग्राहकांना वाटप केले. संचालक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला. जिल्हा बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी क्यूआर कोड काढले आहेत. बँकेचे ग्राहक असणाऱ्या दुकानदार, हॉटेलचालकांसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना क्यूआर कोड दिले जाणार आहेत. अत्याळ शाखेकडे आतापर्यंत ३६ ग्राहकांनी क्यूआर कोडची मागणी केली होती. यातील २३ ग्राहकांना मंजूर झाले होते. अत्याळ, बेळगुंदी, इंचनाळ गावांतील या ग्राहकांना त्याचे वाटप केले. विभागीय अधिकारी एन. एस. कागवाडे, तपासणी अधिकारी एस. आर. नाईक, शाखाधिकारी सतीश पोवार, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com