कबड्डी पंचांच्या बँक पासबुकची झेरॉक्स द्या

कबड्डी पंचांच्या बँक पासबुकची झेरॉक्स द्या

Published on

लोगो ः सकाळ इम्पॅक्ट
.....
कबड्डी पंचांच्या बँक
पासबुकची झेरॉक्स द्या

क्रीडा कार्यालयाचे जिल्हा कबड्डी संघटनेला पत्र

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : कबड्डी पंचांचे मानधन देण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाने अखेर पत्र पाठवून त्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स मागितली आहे. त्याबाबतचे पत्र कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेला पाठविले आहे.
‘सकाळ टुडे’मध्ये ‘कबड्डी पंचांच्या मानधनास टाळाटाळ’ शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. शालेय जिल्हास्तरीय १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या कबड्डी स्पर्धेत पंचगिरी करून सहा महिने उलटले तरी पंचांना मानधन दिलेले नाही. याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर क्रीडा कार्यालयाने तत्परतेने संघटनेला पत्र पाठवून पंचांच्या बँक पासबुकची झेरॉक्स द्यावी, असे म्हटले आहे. कार्यालयाकडे रोख मानधन देण्याची सोय उपलब्ध नसून, ते ऑनलाइन देण्यात येते, असे स्पष्टीकरण क्रीडा कार्यालयातील सूत्रांकडून दिले जात असले तरी काही क्रीडाधिकारी मात्र थेट रोख रक्कम पंचांच्या हाती ठेवतात. मग कबड्डी पंचांचे मानधन देण्यास टाळाटाळ का? असा प्रश्‍न पंचांमधून उपस्थित झाला होता. विशेष म्हणजे एका पंचाच्या पासबुकची झेरॉक्स मानधनासाठीच्या अर्जाला जोडली असूनही मानधन दिले नसल्याचे संबंधित पंचाचे म्हणणे आहे. क्रीडा कार्यालयाने पासबुकची झेरॉक्स मागितली असली तरी मानधन देण्यात तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा पंचांमधून व्यक्त होत आहे.
.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.