रेल्वे स्थानकावरील एस. टी. थांबा बंद

रेल्वे स्थानकावरील एस. टी. थांबा बंद

Published on

15149

रेल्वे स्थानकावरील
एस. टी. थांबा बंद

प्रवाशांतून संताप; पन्नास वर्षांपूर्वीपासूनचा होता सुरू

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २ : पन्नास वर्षांपूर्वीपासूनचा रेल्वे स्थानकावरील एस.टी. थांबा बंद झाल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. दिवसभरातून सुमारे पंच्याहत्तर फेऱ्या थांब्यावरून होत होत्या. हा थांबा बंद होऊन मध्यवर्ती बसस्थानक येथून फेऱ्या सुरू झाल्याने वेळेचे गणित बिघडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
या थांब्यावरून दिगवडे, कणेरी, बोरगाव, कोलोली, पाटीलवाडी, घुंगूर, मांडवकरवाडी, बांदिवडे, नांदारी गावांसाठी एस.टी. फेऱ्या जात होत्या. बसची नोंदणी येथेच होत होती. काही गावांत बसचे मुक्कामही होत होते. हा थांबा बंद झाल्याने येथून सुटणाऱ्या गाड्या मध्यवर्ती बसस्थानक येथून सोडण्यात येत आहेत. प्रत्येक फेरीला नोंदणीसाठी येथेच जावे लागत असल्याने दोन किलोमीटरचे अंतर वाढत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. थांबा बंद होण्यापूर्वी पन्हाळा व जोतिबाला या थांब्यावरूनच गाड्या सोडल्या जात होत्या. रेल्वेतून आलेल्या प्रवाशांना तत्काळ जोतिबाच्या दर्शनासाठी, तर पन्हाळागडाच्या पाहणीसाठी जात येत होते.
-------------------
कोट -
थांब्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर ते पूर्णपणे नष्ट करण्याचे ठरले. या थांब्यासाठी रेल्वेला एक लाख रुपये भाडे देण्यात येत होते. येथून सुटणाऱ्या गाड्यांना प्रवाशांच्या प्रतिसादाचाही प्रश्‍न होता. त्यामुळे महिन्याभरापूर्वी हा थांबा बंद केला आहे.
- संतोष बोगरे (विभागीय वाहतूक नियंत्रक)

येथून सुटणाऱ्या गाड्यांचा विद्यार्थी, ग्रामस्थ, महिलांना आधार होता. कोतोलीपासून पुढे आळवे गाव आहे. तेथील विद्यार्थी शहरातील महाविद्यालयात शिकतात. त्यांना गावातून फाट्यावर चालत यावे लागते. दीड वर्षांपूर्वी येथील बस बंद झाली. स्थानकावरील थांबा असणे जरुरीचे आहे. आता मध्यवर्ती बसस्थानकात थांबावे लागते. गाड्याची अनाऊन्समेंट कधी होते, हेच कळत नाही.
- शरद पाटील (प्रवासी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.