बीएसएन कर्मचाऱ्यांतर्फे निदर्शने

बीएसएन कर्मचाऱ्यांतर्फे निदर्शने
Published on

94384
कोल्हापूर : ‘बीएसएनएल’च्या निवृत कर्मचाऱ्यांनी बीएसएनएल कार्यालयासमोर निदर्शने केली.

बीएसएनएलच्या निवृत कर्मचाऱ्यांची निदर्शने
पेन्शन रिव्हिजनची मागणी; केंद्र सरकारचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : जिल्ह्यात बीएसएनएल निवृत कर्मचाऱ्यांची पेन्शन रिव्हिजन या प्रमुख मागणीसाठी आज ‘बीएसएनएल’च्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि निदर्शने केली. जॉईन्ट फोरम झिंदाबाद, पेन्शन रिव्हिजन झालीच पाहिजे, पेन्शनर्स युनिटी झिंदाबाद, कामगार एकजुटीचा विजय असो, अशा केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
बीएसएनएल निवृत कर्मचाऱ्यांना एक जानेवारी २०१७ पासून केंद्राने तत्त्वत: मान्यता दिलेल्या पेन्शन रिव्हिजनची १५ टक्के फिटमेंटसह रक्कम गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने अद्याप दिलेली नाही. त्यामुळे निवृत बीएसएनएल कर्मचाऱ्यांची केंद्र शासनाच्या विरोधात धरणे आंदोलन आणि निदर्शने सुरू आहेत. यासाठी पहिल्या टप्प्यात आज कर्मचाऱ्यांची सर्व जिल्ह्यातील बीएसएनएल कार्यालयासमोर निदर्शने केली.
‘एसएनपीडब्लूए’चे जिल्हा सचिव तानाजी गंधवाले म्हणाले, ‘‘बीएसएनएल’मधील निवृत्त कर्मचाऱ्यांना एक जानेवारी २०१७ पासून पेन्शन रिव्हिजन देण्यास केंद्र सरकार सात वर्षांपासून टाळाटाळ करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर गेली दोन वर्षे पेन्शनर्स आपल्या हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून काळा दिन पाळणे, एकदिवशीय धरणे आंदोलन आणि निदर्शने करणे, दिल्लीत जंतरमंतरवर धडक मोर्चा काढून सरकारला निवेदन देणे, असा पाठपुरावा करत आहे. एवढे करूनही केंद्र सरकार मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. भारत देशासारख्या लोकशाही देशात ८० ते ९० वर्षांच्या पेन्शनरना आपल्या हक्काच्या पेन्शन वाढीसाठी रस्त्यावर उतरावे लागते, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकत नाही.’’
सचिव सुहास सोनाळकर यांनी केंद्र सरकार आमचा अंत पाहत आहे; पण देशभरातील बीएसएनएल आणि ‘डीओटी’मधील निवृत्त कर्मचारी या आंदोलनाद्वारे पेन्शनर्स ताकद काय आहे दाखवून देतील, असे सांगितले. कोल्हापूरमधील आंदोलनाचे नेतृत्व ‘एआयसीजीपी’चे जिल्हा सचिव शिवाजी तोंदले, अमृत देसाई, मकरंद अभ्यंकर, सुरेश देसाई, सुरेश जाधव, रणजित माने, गौस पठाण, राजू खाद्रे. पी. ए. पिटके आदींनी केले. निदर्शने धरणे आंदोलनात तीनशेहून अधिक निवृत कर्मचारी आणि महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com