वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन घ्यावे

वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन घ्यावे

Published on

वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन घ्यावे

खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी लागू होण्यासाठी बारा व चोवीस वर्षांनंतर शिक्षकांना विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. याबाबतचे प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने लवकर घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्यातर्फे आज करण्यात आली. त्याबाबतचे निवेदन महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र भोई यांना दिले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून राज्यभरात हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी दोन हजार रुपये शुल्क घेण्यात आले होते. कोरोना संपल्यानंतर महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने हे प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावे, अशी मागणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने तीन जूनच्या आदेशाने हे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे ऑफलाईन पद्धतीने आयोजन करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार प्रशिक्षण लवकर घेण्याची मागणी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, शहराध्यक्ष संतोष पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.