विद्या पुरवणी लेख

विद्या पुरवणी लेख

औषधनिर्माण क्षेत्रातील करिअरच्या आव्हानात्मक संधी
- डॉ. चंद्रप्रभू एम. जंगमे,
प्राचार्य, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर
--------
औषधाविना आपण आधुनिक जगाची कल्पनादेखील करू शकणार नाही. जन्मापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत आवश्यक घटकांपैकी एक म्हणजे औषध होय. भारत हा देश औषध उद्योगाची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जात आहे. भारतीय फार्मास्युटिकल उद्योग सध्या औषध उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असून, भारत हा जागतिक स्तरावर जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा प्रदाता आहे.
--------------------
भारतीय फार्मास्युटिकल क्षेत्र विविध लसींच्या जागतिक मागणीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त, यूएसमधील जेनेरिक मागणीच्या चाळीस टक्के आणि यूकेमधील सर्व औषधांपैकी पंचवीस टक्के पुरवठा करते. देशांतर्गत फार्मास्युटिकल उद्योगात जवळपास तीन हजार औषध कंपन्यांचे नेटवर्क आणि दहा हजार पाचशे उत्पादन युनिट समाविष्ट आहेत. सध्या, जागतिक स्तरावर एड्सचा सामना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अँटीरेट्रोव्हायरल औषधांपैकी ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त औषधांचा पुरवठा भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांकडून केला जातो. कमी किमतीच्या आणि उच्च दर्जाच्या औषधांमुळे भारताला जगातील फार्मसी म्हणून ओळखले जाते.
भारतातील औषध उद्योग १३० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. दोनशेहून अधिक देशांना भारतीय फार्मा निर्यातीद्वारे सेवा दिली जाते. संशोधन हा फार्मसी व्यवसायाचा जणू प्राण आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड आहे आणि त्यात करिअर करावे, असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी औषधनिर्माणशास्त्र हा यशस्वी पर्याय ठरू शकतो.
औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमासाठी १२ वी विज्ञान (PCB /PCM ) शाखेनंतर प्रवेश घेता येतो. यामध्ये पुढील अभ्यासक्रमाचा समावेश होतो.
डी. फार्मसी (D. PHARMACY) : या अभ्यासक्रमाला बारावी विज्ञान पास ही पात्रता असून शासकीय अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयातील प्रवेशासाठी राज्यपातळीवरून प्रवेश प्रक्रिया घेतली जाते.
बी. फार्मसी (B. PHARMACY) : या अभ्यासक्रमाला NEET किंवा MHT-CET या प्रवेशपूर्व परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित किंवा जीवशास्त्र या विषयात (खुला वर्ग- ४५ टक्के आणि मागास वर्ग- ४० टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षेत नॉन झीरो स्कोअर असावा.
एम. फार्मसी (M. PHARMACY): हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असून यासाठी राष्ट्रीय स्तरावर G-PAT किंवा प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
फार्म डी. (PHARM D.) : डॉक्‍टर ऑफ फार्मसीसाठी बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व गणित किंवा जीवशास्त्र या विषयात किमान खुला वर्ग ५० टक्के आणि मागास वर्ग- ४५ टक्के गुण. तसेच NEET किंवा महाराष्ट्र शासनाच्या सीईटी प्रवेशपूर्व परीक्षेत नॉन झीरो मार्क्स असावेत. बारावीनंतर पाच वर्षांचा शैक्षणिक अभ्यास आणि एक वर्षाची हॉस्पिटल इंटर्नशिप करावी लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com