

94421
कोल्हापूर : शहरातील भाडे भूपट्टाधारकांच्या प्रश्नावर मंगळवारी महापालिका सभागृहात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, अशोक पोवार, उदय धारवाडे, दिवाकर पोर्लेकर, अजित चव्हाण, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
अवास्तव भाडे भरणार नाही;
वाढीवचे दोन टक्केच भरू
भाडे भूपट्टाधारकांची भूमिका; शहर नागरी कृती समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : महापालिकेचे भाडे भूपट्टाधारक शासनाच्या निर्णयानुसार रेडीरेकनरच्या दोन टक्के जादा भाडे भरण्यास तयार आहे. महापालिकेने आकारलेले अवास्तव भाडे भरण्यास विरोधाची भूमिका आज महापालिका भाडे भूपट्टाधारकांनी घेतली. जादा दोन टक्के भाडे भरण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाला पाठवावा, अशी मागणी भाडे भूपट्टाधारकांतर्फे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे आज बैठकीत महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.
महापालिका सभागृहात भाडे भूपट्टाधारकांच्या प्रश्नासंदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी समितीचे रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, अशोक पोवार, उदय धारवाडे, दिवाकर पोर्लेकर, अजित चव्हाण, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
गेली आठ वर्षे भाडेवाढ आकारणीचा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेबरोबर मिळकत धारकांचेही नुकसान होत आहे. शहर नागरी कृती समितीने दिलेल्या निवेदनाचा अभ्यास करावा. त्यातील दिलेले मुद्दे तपासून पहावेत. भाडे भूपट्टाधारकांच्या मागणीप्रमाणे अवास्तव भाडे भरण्यास विरोध आहे. तसेच राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे रेडीरेकनरच्या दोन टक्के वाढीने भाडे भरण्यास तयार आहोत. तसा आपण महापालिकास्तरावर प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा, स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतो, अशी भूमिका रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, अशोक पोवार, उदय धारवाडे, दिवाकर पोर्लेकर, अजित चव्हाण, चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत मांडली.
यावेळी राजाभाऊ मालेकर, प्रसाद बुलबुले, राजू हरवंदे, शहाजी भोसले, रतनचंद ओसवाल, सखोबा सुतार, लहुजी शिंदे, झाकीर उस्ताद, सचिन साबळे, गिरीश पंदारे, अमृत शिंदे आदींसह भाडे भूपट्टा मिळकत धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------
चौकट
तातडीने निर्णय घेऊ
अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी भाडे भूपट्टाधारकांच्या निवेदनासह त्यांच्याकडे असलेले इतर शासकीय भाडेकरार, इंडेक्स उतारे व काही शासन निर्णय मागून घेतले. तसेच या संदर्भात चर्चा करून तातडीने निर्णय घेऊ, असे आश्वासन रोकडे यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.