एसटी स्टॅण्ड दीड कोटी चोरी - पथके रवाना

एसटी स्टॅण्ड दीड कोटी चोरी - पथके रवाना

Published on

पाच संशयितांनी दागिन्यांची
बॅग चोरल्याचे निष्पन्न

संशयित पळाले सांगलीकडे ः ओळख पटली, तपासासाठी पोलिसांची तीन पथके

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ः मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एक कोटी रुपये किमतीचे दीड किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरणाऱ्यांची ओळख पोलिसांना पटली आहे. संशयित पाच जण असून, त्यांनी पाळत ठेवून ही बॅग चोरली आहे. चोरटे बॅग घेऊन सांगलीच्या दिशेने पळून गेल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. पोलिस चोरट्यांच्या घरापर्यंत पोहचले आहेत, मात्र तेथे ते मिळाले नाहीत. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याचे एक पथक रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दागिन्यांची होलसेल विक्री करणारे मुंबईतील कमिशन एजंट सुजितसिंग सुखदेवसिंग चौहान यांची दीड किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी पुण्याला जाणाऱ्या बसमधून रविवारी सायंकाळी चोरली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी संशयित चोरट्यांची ओळख पटली. त्यांच्या घराचा पत्ता मिळताच पोलिस तेथे पोहचले, मात्र तेथे ते मिळाले नाही. ते अन्य ठिकाणी पळाल्याची माहिती पोलिसांच्या एका पथकाला मिळाली आहे.
दरम्यान, चौहान यांची सविस्तर माहिती घेऊनच ही चोरी केली आहे. ते कोल्हापुरात आल्यापासून साधारण पाच संशयित त्यांचा पाठलाग करत होते. चौहान गुजरीत असताना त्यांच्या आजूबाजूला त्यांचा वावर असल्याचेही पोलिसांच्या तपासात दिसले आहे. तिकीट काढतानाही संशयित तेथे उपस्थित होते. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.