अवैध गॅस भरणा केंद्रावर कारवाई

अवैध गॅस भरणा केंद्रावर कारवाई

Published on

94415
...
अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा
एकावर कारवाई : २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : साळोखेनगर येथील भारतनगर झोपडपट्टी येथील अवैध गॅस भरणा केंद्रावर आज शहर पुरवठा विभागाने छापा टाकला. यामध्ये वजनकाटा, एक एचपी क्षमतेची मोटार, पाईप नोझल, १४ किलो वजनाचे दोन भरलेले सिलिंडर, तीन रिकामी सिलिंडर असा सुमारे २५ हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध गॅस भरणा केंद्र महंमद अल्लाबक्ष मकानदार हा चालवत होता. त्याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन धापसे- पाटील (अन्नधान्य वितरण अधिकारी) यांच्यासह पुरवठा निरीक्षक मुकुंद लिंगम, भाऊसाहेब खोत व पुरवठा निरीक्षक अक्षय ठोंबरे यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.