ग्रामीण रुग्णालयाजवळ बस थांब्याची मागणी

ग्रामीण रुग्णालयाजवळ बस थांब्याची मागणी

Published on

ग्रामीण रुग्णालयाजवळ
बस थांब्याची मागणी
चंदगड ः येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ बस थांबा करावा, अशी मागणी परिसरातील विविध वसाहतींतील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. ग्रामीण रुग्णालयाजवळ इलगे वसाहत, शिक्षक कॉलनी, लक्ष्मीनगर वसाहत, सेंट स्टीफन स्कूल, उर्दू शाळा, सरकारी दवाखाना, तेलंग कॉलनी, हळीज्वाळे वसाहत, आझादनगर वसाहत आहे. येथील नागरिकांना ग्रामीण रुग्णालय मध्यवर्ती पडते. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण यांना गाडीत चढणे-उतरणे सोयीचे आहे. परगावाहून चंदगडला येणाऱ्या नागरिकांना त्यांचे साहित्य घरी नेण्यासाठीही हेच ठिकाण जवळचे असल्याने येथे बस थांबा मंजूर करावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर संगम नेसरीकर, कलिम मदार, सलीम बेपारी, मोहिनी इलगे, प्रियांका गावडे, साहेबराव साबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.