गडहिंग्लज चर्चचे फादर कुस्तास लिमा प्रमुख

गडहिंग्लज चर्चचे फादर कुस्तास लिमा प्रमुख

gad32.jpg
94567
गडहिंग्लज ः फादर कुस्तार लिमा
-------------------------------------------------
गडहिंग्लज चर्चचे फादर
कुस्तास लिमा प्रमुख
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ ः येथील संत अंतोनी चर्चच्या प्रमुखपदी फादर कुस्तास लिमा यांची नियुक्ती केली. वरिष्ठ धर्माधिकारी रेव्हरंट फादर सायमन फर्नांडिस यांनी त्यांना चर्चची चावी देऊन त्यांची नेमणूक केली.
तालुक्यातील १७ खेड्यांमध्ये ५०० हून अधिक ख्रिस्ती बांधव कुटुंब आहेत. त्यांच्यासाठी गडहिंग्लजला भव्य संत अंतोनी चर्च उभारले आहे. त्याच्या अखत्यारीत नेसरी, हेब्बाळ जलद्याळ, माद्याळ, पिंपळगाव येथे लहान प्रार्थना केंद्रे आहेत. २०१८ ते २०२४ ही सहा वर्षे रेव्हरंट फादर जो मंतेरो यांनी या चर्चचा कार्यभार सांभाळला. त्यांची बदली खानापूर (जि. बेळगाव) येथे झाली. त्यांच्या रिक्त जागी खानापुरातील फादर कुस्तास लिमा यांची बदली झाली. पूर्वीच्या धर्मगुरूंकडून त्यांनी औपचारीकरित्या कार्यभार स्वीकारला. ख्रिस्ती बांधवांनी त्यांचे स्वागत केले. नूतन फादर कुस्तास लिमा यांनी चर्च व परिसरातील खेडोपाड्यातील सर्व धार्मिक व सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवून सर्वधर्मसमभाव जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com