शिवसेना आंदोलन

शिवसेना आंदोलन

Published on

94630
कोल्हापूर : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटातर्फे बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन झाले.

दानवे यांच्या निषेधार्थ
शिवसेनेची निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच महिला उपसभापतींच्या विरोधी पक्षनेत्याने लोकप्रतिनिधीबाबत अपशब्द वापरण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तत्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज झालेल्या निदर्शनावेळी ते बोलत होते. विधिमंडळात जो प्रकार घडला तो क्लेशदायक होता. महिला उपसभापती, महिला लोकप्रतिनिधी असताना अपशब्द वापरणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही चव्हाण म्हणाले. यावेळी महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, समन्वयक पूजा भोर, शिव उद्योग सहकार सेना शहरप्रमुख मंगलताई कुलकर्णी, पूजा कामते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाटगे, अॅड. अमोल माने आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.