अधिवेशनातून- आबिटकर

अधिवेशनातून- आबिटकर

Published on

लोगो
...
लोकसेवा अधिनियमाची
प्रभावी अंमलबजावणी करावी
आमदार प्रकाश आबिटकर यांची मागणी
कोल्हापूर, ता. ३ ः राज्यातील नागरिकांसाठी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत केली. दरम्यान, अधिनियम प्रभावीपणे राबविण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यापासून पायलट प्रोजेक्टला लवकरच प्रारंभ होणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व समय उचित सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे. त्यानुसार राज्यातील सर्व विभागांमध्ये कामकाज होत नसून नागरिकांना वेळेत लोकसेवा उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. त्यामध्ये प्रामुख्याने तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पुनर्वसन विभाग, नगररचना विभाग, समाजकल्याण विभागासह बहुतांश सर्वच विभागांमध्ये कामकाज करण्यास दिरंगाई करण्यात येत असल्याचे आमदार आबिटकर यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार अतुल भातखळकर, आमदार बच्चू कडू, आमदार जयंत पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.