पुरस्काराने काम करण्याची ऊर्जा

पुरस्काराने काम करण्याची ऊर्जा

Published on

ajr41.jpg....
94786
आजरा : येथील पेरणोली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रियांका जाधव, ग्रामसेवक संदीप चौगुले यांचा सत्कार करताना संजय ढमाळ. दिनेश शेटे, बसवराज गुरव, महादेव तिवले, सूर्यकांत नाईक, पी. डी. ढेकळे.
--------
पुरस्काराने काम करण्याची ऊर्जा
संजय ढमाळ ः आजऱ्यात सरपंच, ग्रामसेवकांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ५ ः निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केल्यास समाज त्याची दखल घेतो. आजरा तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांनी गावच्या विकासात मोलाची भूमिका बजावण्याचे काम केले आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार उमेदीने काम करण्याची ऊर्जा देणारी आहे, असे प्रतिपादन आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी केले.
येथील पंचायत समितीमध्ये यशवंत सरपंच व आदर्श ग्रामपंचायत यांचा सत्कार झाला. श्री. ढमाळ अध्यक्षस्थानी होते. सहायक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता महादेव तिवले, पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता सूर्यकांत नाईक, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पी. डी. ढेकळे प्रमुख उपस्थित होते.
गटविकास अधिकारी श्री. ढमाळ म्हणाले, ‘सरपंच व ग्रामसेवक ही ग्रामविकासाची दोन चाके आहे. त्यांनी समन्वयाने काम केल्यास गावचा विकास व्हायला वेळ लागणार नाही.’ यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबाबत वाटंगी सरपंच संजय पोवार, ग्रामसेवक रणजित पाटील, खानापूर सरपंच कल्पना डोंगरे, ग्रामसेवक विशाल दुंडगेकर, पेरणोली सरपंच प्रियांका जाधव, ग्रामसेवक संदीप चौगुले, मुरुडे सरपंच प्रतीक पाटील, ग्रामसेवक विठ्ठल कुंभार, आदर्श ग्रामसेवक अशोक सानप व संतोष कुंभार, जिल्हा परिषद आदर्श गोठा पुरस्कार प्राप्त दत्ता पाईम, जिल्हा परिषद आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त रणजित कालेकर यांचा सत्कार झाला. श्री. पोवार, श्री. चौगुले, श्री. कालेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सहायक गटविकास अधिकारी श्री. शेटे यांनी स्वागत केले. गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.