डॉ. आंबेडकर हॉलचे नुतनीकरण करा

डॉ. आंबेडकर हॉलचे नुतनीकरण करा

Published on

डॉ. आंबेडकर हॉलचे
नूतनीकरण करा
शिवसेनेतर्फे मागणी ः गडहिंग्लज पालिकेचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ ः संकेश्वर रोडवरील नगरपरिषदेच्या मालकीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासह त्याचे नूतनीकरण तातडीने करून घेण्याची मागणी शिवसेने (ठाकरे गट) तर्फे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे आज केली. यासंदर्भात गायकवाड यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली.
डॉ. आंबेडकर हॉलमधील गैरसोयींबाबत शहरप्रमुख संतोष चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या प्रश्नाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शहरातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय व सर्वधर्मीयांचे हक्काचे हॉल म्हणून आंबेडकर हॉलकडे पाहिले जाते. तो कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावा. किचन व जेवण पंगतीसाठी मंडप उभारावे लागते. यामुळे तेथे पत्र्याचे शेड मारणे आवश्यक आहे. स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी कामगाराची नेमणूक करावी. अनुचित प्रकार घडू नयेत म्हणूस सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. रात्री सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी. पार्किंगसाठी अडचण येऊ नये यासाठी पट्टे मारून द्यावेत. पाण्याच्या नव्या टाक्या बसवाव्यात. अशा पद्धतीने नूतनीकरण करताना हा हॉल रहिवासी भागात असल्याने रात्री दहानंतर स्पीकर न लावण्याचा नियम आवश्यक आहे. माजी तालुकाप्रमुख विलास यमाटे, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, भरत जाधव, महादेव पाटील, राजू रामजी, आनंद माने, संदीप कुराडे, सुनील डवरी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.