गोपालक मालिका भाग

गोपालक मालिका भाग

Published on

(फोटो - ९५५२४, ९५५१५)
देशी गायीचा फोटो वापरावा...
...

गोपालनातून अनोख्या वाटाः मालिका भाग १

लीड

देशी वंशाच्या गायींचे संगोपन व्हावे, यासाठी समाजातील सर्व स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही गोपालकांनी देशी गायीचे संगोपन करून व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण केल्या आहेत. स्वार्थ आणि परमार्थ यांची सांगड घालून त्यांनी एक नवी वाट दाखवली आहे. अशा गोपालकांचा घेतलेला आढावा...
...
पंचगव्य चिकित्सेतून व्यवसायाची संधी
देशी गाय संगोपनातून साधली किमयाः गोमूत्र अर्क, नस्य, औषधी तेलाचे उत्पादन
ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः देशी गायींचे पंचगव्य (दूध, गोमूत्र, शेण, तूप आणि ताक) हे मानवी शरीरासाठीही उपयुक्त आहे. यापासून विविध प्रकारची औषधेही बनवली जातात. यातूनच पंचगव्य चिकित्सा ही एक उपचार पद्धती पुढे आली. पन्हाळा तालुक्यातील वारणा कोडोली येथील विनायक पाटील आणि निगवे खालसा येथील अंकुश म्हाळुंगेकर यांनी देशी गायींचे संगोपन करून विविध प्रकारचे गोमूत्र अर्क, नस्य, औषधी तेल बनवले आहे. त्यांनी याचा उपयोग करून रुग्णांनाही बरे केले आहे.
भारतीय गाय ही वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे देशी गायीच्या पंचगव्याचा उपयोग करून शेतीसाठी विविध प्रकारची खते आणि किटकनाशके बनवली जातात. तसेच याचा उपयोग करून मानवी आरोग्याला उपयुक्त ठरणारी औषधेही बनवली जातात. कोडोली येथील विनायक पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून पंचगव्य चिकित्सा, प्रशिक्षण आणि उत्पादन यामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी १२ प्रकारचे गोमूत्र अर्क बनवले आहेत. तसेच तीन प्रकारचे नत्स्य (नाकात घालण्याचे ड्रॉप्स) बनवले आहेत. या शिवाय गोमूत्र घनवटीही बनवली आहे. अशा औषधांच्या माध्यमातून ते रुग्णांवर उपचार करतात. कोरोना काळातही त्यांनी अनेक रुग्णांना सेवा दिली. देशी गायीच्या शेणापासून ते रंग बनवतात.
तर निगवे खालसा येथील अंकुळ म्हाळुंगेकर यांनी देशी गायीच्या पंचगव्यापासून गोमूत्र अर्क, मसाज तेल, दंतमंजन अशी उत्पादने बनवली आहेत. मधुमेहावर गोमूत्र अर्काचा चांगला परिणाम पहायला मिळाला आहे. निसर्गपूरक जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून पंचगव्य चिकित्सा ही उपचार पद्धती लोकप्रिय होऊ लागली आहे.
...

पंचगव्य चिकित्सेचा अभ्यासक्रम
विनायक पाटील यांनी सर्टिफिकेट कोर्स इन पंचगव्य चिकित्सा व सेंद्रिय शेती हा एक वर्षाचा अभ्यासक्रम बनवला आहे. या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाची मान्यता आहे. १० वी नंतर हा एक वर्षाचा अभ्यासक्रम ते शिकवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.