नंगीवली रस्ता काम

नंगीवली रस्ता काम

Published on

94865
कोल्हापूर ः संभाजीनगर रस्त्यावर सुरू केलेले खडीकरणाचे काम.

नंगीवली चौक ते संभाजीनगर
रखडलेले रस्त्याचे काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे रखडलेल्या नंगीवली चौक ते संभाजीनगर दरम्यानच्या रस्त्यावर खडीकरणाचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले. उघडीप अशीच राहिली, तर खडीकरणामुळे खड्याचे पॅचवर्क होऊन नागरिकांचा त्रास काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
मिरजकर तिकटी ते संभाजीनगर दरम्यानच्या रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यामुळे मिरजकर तिकटी ते नंगीवली चौकापर्यंतचा रस्ता टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आला. नंगीवली चौकापासूनच्या संभाजीनगरपर्यंतच्या रस्त्याचे काम पाईपलाईनच्या कामामुळे रखडले होते. पाईपलाईननंतर त्याचे पॅचवर्क त्या ठेकेदाराकडून होणे आवश्‍यक होते; पण ते कामच केले नसल्याने खोदाईच्या ठिकाणी प्रचंड खड्डा तयार झाला होता. त्यामुळे वाहनधारक त्या रस्त्याचा वापर करत नव्हते. उलट दिशेने वाहनधारक जात असल्याने अपघाताचा धोका होता. त्यामुळे ठेकेदार कंपनीला खडीकरण करण्यास सांगितले. खोदाईच्या ठिकाणची माती काढून त्यात खडीचा भरणा करण्यात येत होता. त्यातही काही ठिकाणी घरगुती पाईपलाईनची कामे केली जात होती.
पाईपलाईनसाठी खोदलेल्या ठिकाणी या खडीकरणामुळे किमान वाहने चालवण्यायोग्य रस्ता होणार आहे. पावसामुळे त्या खड्ड्यात पाणी साचत असल्याने खडीकरणाने त्यावरून प्रवास करणे तुलनेने सोपे होईल. याबरोबरच बेलबागेतील भोसले हॉस्पिटलजवळील रस्त्याचे रखडलेले कामही सुरू करण्यात आले आहे. गोखले कॉलेज ते वाय. पी. पोवार चौकापर्यंतचे ड्रेनेजच्या चेंबरबरोबरच गटारीचे कामही केले जात आहे. पावसाने उघडीप दिल्याने ही कामे करण्यास संधी मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.