‘चला बालशास्त्रज्ञ होऊया’ उपक्रम

‘चला बालशास्त्रज्ञ होऊया’ उपक्रम

Published on

‘चला बालशास्त्रज्ञ
होऊया’ उपक्रम
इचलकरंजी : येथे संडे सायन्स स्कूलमध्ये १४ जुलैपासून ‘चला बालशास्रज्ञ होऊया’ उपक्रम आयोजित केला आहे. यामध्ये दर रविवारी दोन तासांमध्ये विज्ञान विषयातील विविध संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित असणारे प्रयोग किंवा सायन्स मॉडेल प्रत्येक विद्यार्थी स्वत: हाताने बनवणार आहेत. त्यांनी तयार केलेले साहित्य त्यांनाच घरी दिले जाणार आहे. त्यातून त्यांची प्रयोगशाळा घरी साकारणार आहे. उपक्रमात विद्यार्थी जुलै ते जानेवारी दरम्यान २० रविवारी एकत्र जमून स्वहस्ते प्रयोग करीत विज्ञान शिकणार आहेत. तसेच विविध गोष्टींचे निरीक्षण करणे, त्यांच्या नोंदी घेणे, अशा सवयीही मुलांना आपोआपच लागतात. विद्यार्थ्यांना शेवटी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी प्रत्येक तुकडीमध्ये ४० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती संयोजिका आसावरी बाबर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.