नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या ‘सीईटी’ साठी मुदतवाढ

नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या ‘सीईटी’ साठी मुदतवाढ

Published on

नागरी सेवा पूर्वपरीक्षेच्या
‘सीईटी’साठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः नागरी सेवा पूर्वपरीक्षेच्या प्रशिक्षणासाठी आयोजित केलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) अर्ज करण्याची मुदत २० जुलैपर्यंत वाढविण्यात आली. या मुदतीत अधिकाधिक इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन कोल्हापुरातील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. लता जाधव यांनी केले.
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर यांच्यासह ‘यशदा’संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे, पीसीएमसी संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी पुणे, अंबरनाथ नगरपालिका संचलित यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र अंबरनाथ, ठाणे महानगरपालिका संचलित चिंतामणराव देशमुख यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र ठाणेतर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्थांमध्ये नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षणासाठी २५ ऑगस्टला सकाळी अकरा ते एक या वेळेत प्रवेश परीक्षा होणार आहे. त्याबाबतची अधिक माहिती (https://pitckolhapur.org/preias/CET.aspx) या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.