म्हाळेवाडी येथे फॉर्म भरण्यासाठी गर्दी

म्हाळेवाडी येथे फॉर्म भरण्यासाठी गर्दी

chd51.jpg
94980
म्हाळेवाडी ः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फॉर्म भरण्यासाठी झालेली गर्दी.
---------------------
म्हाळेवाडी येथे फॉर्म भरण्यासाठी गर्दी
आमदार पाटील यांचे प्रयत्न ः विविध योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ५ ः म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे आमदार राजेश पाटील व त्यांच्या पत्नी सुश्मीता यांच्या संकल्पनेतून ‘आमदार आपल्या दारी... योजना पोहोचतील घरोघरी’ या अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म भरून घेतले. यासाठी गावातील लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. यावेळी शासनाच्या विविध योजनांचीही माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. गावागावात फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. आमदार पाटील यांनी हा फॉर्म भरण्यासाठी लाभार्थ्यांच्या गावात जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाळेवाडीतून त्याची सुरुवात केली. सुश्मीता पाटील म्हणाल्या, ‘नवीन योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत. अशिक्षित, अल्पशिक्षित लाभार्थ्यांना ते भरणे अवघड जाते. त्यासाठी त्यांची कागदपत्रे जमा करून फॉर्म भरण्यासाठी मदत केली आहे.’ बांधकाम कामगार नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनांसह शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. लाभार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन लाभ देणार असल्याचे सांगितले. सरपंच सी. ए. पाटील, उपसरपंच विजय मर्णहोळकर, सूरज पाटील, पी. वाय. पाटील, विनायक पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com